शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनोवरून सरकार लक्ष्य

By admin | Updated: April 3, 2016 15:52 IST

मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोप्रश्नी सरकारला सध्या सर्वच थरांमधून टीकेस सामोरे जावे लागत आहे.

ऑनलाइन लोकमत 
पणजी, दि. ३ -  मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोप्रश्नी सरकारला सध्या सर्वच थरांमधून टीकेस सामोरे जावे लागत आहे. अपक्ष आमदार रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी शनिवारी जोरदार हल्ला चढवत सरकार कॅसिनो लॉबीचे एजंट बनल्याचा आरोप केला.
खंवटे व सावळ यांनी शनिवारी येथे संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. खंवटे म्हणाले की, कॅसिनोप्रश्नी सरकारने घेतलेला निर्णय ही गोमंतकीय जनतेची फार मोठी फसवणूक आहे. कॅसिनोंना पर्यायी जागा शोधतोय, असे सरकार सांगून गोमंतकीयांशी गेम खेळत आहे. कॅसिनोंसाठी पर्यायी जागा शोधणे ही कॅसिनो मालकांची जबाबदारी आहे; पण सरकार कॅसिनोंचे एजंट बनल्यामुळे सरकारच जागा शोधत असल्याचे सांगते. एखाद्या उद्योजकाचा डिचोलीतील उद्योग जर आजारी झाला व तो चालेनासा झाला, तर त्या उद्योगाला दुसर्‍या शहरात जागा कधी सरकार शोधून देते का, ते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अगोदर सांगावे.
खंवटे म्हणाले की, कॅसिनोंसाठी गेमिंग आयोग नेमण्याचे आश्‍वासन चार वर्षांपूर्वी सरकारने दिले होते; पण सरकार आता या आयोगाच्या नियुक्तीबाबत काहीच बोलत नाही. मांडवीतील कॅसिनोंना आपण जमिनीवर जागा देऊ, अशी भाषा सरकार करते. आम्ही या प्रकारास पूर्णपणे विरोध करू. जमिनींवर म्हणजे हॉटेलमध्ये अगोदरच कॅसिनो खूप चालत आहेत. त्यात आणखी भर नको. मांडवीतील कॅसिनोंना सरकारने खोल समुद्रातच पाठवावे. आणखी यू-टर्न घेऊ नयेत. सध्या निवडणुकीचे वर्ष असल्याने विविध प्रकारे निवडणूक निधी उभा करण्याचेच काम सरकार करत आहे. 
 
गोविपा'ने काढला पाठिंबा
मडगाव : गेल्या चार वर्षांत भाजप सरकारने आपली पाच टक्के आश्‍वासनेही पूर्ण केलेली नाहीत, अशी खरमरीत टीका सत्ताधारी भाजप पक्षाचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी केली आहे. या सरकारला आपण पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपची लोकविरोधी धोरणे पाहून मी हा पाठिंबा काढून घेतला आहे, असे ते म्हणाले. गेल्या चार वर्षांत या सरकारने फक्त 'यू टर्न' घेतले आहेत. मांडवीतून कॅसिनो हलवण्याबाबतही या सरकारने तेच केले आहे. कारण कॅसिनो उद्योगाकडून भाजपला निवडणुकीचा निधी मिळत असल्यामुळे ते या उद्योगाला हात लावू शकत नाहीत, असे ते म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील ८५ टक्के आश्‍वासने पूर्ण केली आहेत, असा दावा केला असला, तरी त्यात तथ्य नाही. या सरकारने ५ टक्केही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आपला गोविपा पक्ष भाजपपासून दोन हात दूर राहणे पसंत करेल, असे ते म्हणाले.