शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

माध्यम धोरणावर सरकार ठाम

By admin | Updated: April 27, 2016 02:02 IST

पणजी : विधानसभा निवडणुका अवघ्या दहा महिन्यांवर आलेल्या असताना राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी रणकंदन

पणजी : विधानसभा निवडणुका अवघ्या दहा महिन्यांवर आलेल्या असताना राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी रणकंदन सुरू झाले आहे. संघाचे नेते व भारतीय भाषा सुरक्षा मंचने कडवी टीका करत राज्यभर भाजपविरोधात वातावरण निर्मिती चालविली असली, तरी आपल्या धोरणात कोणताच बदल करायचा नाही, असे मंगळवारी भाजपच्या सर्व मंत्री-आमदारांच्या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिल्लीहून परतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पर्वरी येथील मंत्रालयात भाजपच्या सर्व मंत्री-आमदारांची बैठक घेतली. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी सध्या सुरू असलेल्या प्रचंड वादाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री, आमदारांना दिली. माध्यमप्रश्नी आम्ही सध्या स्वीकारलेले धोरण हे योग्य आहे. डायोसेझन संस्थेच्या १३६ इंग्रजी शाळांना अनुदान दिले जात असून ते कायम राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री, आमदारांना सांगितले व सर्वांनी ते मान्य केले. आम्ही माध्यमप्रश्नी सध्याचा तोडगा काढताना भारतीय भाषा सुरक्षा मंचला म्हणजेच संघाच्या नेत्यांना दोन वर्षांपूर्वी विश्वासात घेतले होते, असे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले. भाषा मंचने आता आंदोलन करण्याचे कारणच राहिलेले नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. (खास प्रतिनिधी)