शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कोविडबाबत सरकारी सुविधा उत्तमच- विश्वजित राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:35 IST

बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात आणखी तीन नवे विभाग तयार; राणेंची माहिती

पणजी : कोविड व्यवस्थापनासाठी सरकारने ज्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत, त्या उत्तमच आहेत. त्याविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारणच नाही असे निवेदन आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केले.सोशल मिडियावरून काहीजण सरकारी आरोग्य सुविधांविषयी प्रश्न निर्माण करत आहेत, त्याविषयी बोलताना मंत्री राणे म्हणाले, की सरकारने सर्वप्रथम मडगाव येथे ईएसआय इस्पितळचे रुपांतर कोविड इस्पितळात केले. तिथे आतार्पयत मोठ्या संख्येने कोविडग्रस्तांवर उपचार झाले. शेकडो कोविडग्रस्त आजारातून बरेही झाले. ज्यांना को-मॉर्बिडीटी म्हणजे एकापेक्षा जास्त आजार होते, त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. काही अन्य रुग्णही दगावले. यामुळे आम्ही बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात आणखी तीन नवे विभाग तयार केले आहेत.मंत्री राणे म्हणाले, की आम्ही गोमेकॉतील तिन्ही विभाग सक्रिय केले आहेत. एका विभागाचे अगोदर रंगकाम झाले नव्हते. त्यामुळे अगोदर दोन विभाग सुरू झाले. रंगकामही करून घेतले व तिसरा विभाग सुरू झाला. ज्यांना कोविडसह अन्य विविध प्रकारचे आजार अगोदरपासून आहेत, त्यांच्यावर या विभागांमध्ये उपचार केले जातात. विविध रुग्ण तिथे ठेवले गेले आहेत. काहीजणांना अनेक वर्षे डायबेटीस असतो, उच्च रक्तदाबाची व्याधी असते किंवा अन्य आजार असतात व त्यात पुन्हा कोविडची लागण झालेली असते, अशा रुग्णांवर या तीन विभागांमध्ये उपचार केले जात आहेत.मंत्री राणे म्हणाले, की सरकारने आरोग्य क्षेत्रात कमी कालावधीत चांगल्या सुविधा निर्माण केल्या. चांगले डॉक्टर्स आमच्याकडे आहेत. आपण सरकारी सुविधांविषयीचे फोटो कुणालाही दाखविण्यास तयार आहे. कोविड येण्यापूर्वी आमच्याकडे एकही प्रयोगशाळा नव्हती, कोविड चाचणीसाठी नमुने पुणे येथे पाठवावे लागत होते. आम्ही प्रयोगशाळेचीही निर्मिती केली.