शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

गोमेकॉ... जिथे हरवतात रक्ताच्या चाचणीचे अहवाल!

By admin | Updated: December 11, 2015 00:25 IST

पणजी : गोमेकॉत प्रसंगानुरूप विविध अतिरिक्त सुविधांची जोड देण्याचा एका बाजूने प्रयत्न होत असतानाच रक्ताच्या चाचणीचे

पणजी : गोमेकॉत प्रसंगानुरूप विविध अतिरिक्त सुविधांची जोड देण्याचा एका बाजूने प्रयत्न होत असतानाच रक्ताच्या चाचणीचे अहवाल हरवण्याचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे रुग्णांची नाहक धांदल होत आहे. रुग्णांची ती मोठी डोकेदुखी ठरत आहे. रक्ताचे व लघवी चाचणीचे अहवाल गोमेकॉच्या १३ क्रमांकवर असलेल्या प्रयोगशाळेत केले जातात. रुग्णांसाठी ते मोफत असतात. चाचणीचे अहवाल संबंधित ओपीडीच्या नोंदणी काउंटरवर मिळविण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अनेकवेळा असे होते की ओपीडीच्या काउंटरवर हे अहवालच मिळत नाहीत. प्रयोगशाळेतून अहवाल आले नाहीत, असे रुग्णांना सांगितले जाते. त्यामुळे रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक प्रयोगशाळेकडे धाव घेतात. तिथे त्यांना अहवाल ओपीडी काउंटरवर पाठविल्याचे सांगितले जाते. रुग्णांना इकडून तिकडे नाचविण्याचे हे प्रकार वारंवार घडतात. गुरुवारी मेडिसीन विभागात दोन रुग्णांच्या बाबतीत अशीच गोष्ट घडली. शेवटी डॉक्टरने हस्तक्षेप करून त्यांना दुहेरी अहवाल मिळवून दिला. दुहेरी प्रत मिळविण्यासाठी डॉक्टर पत्र लिहून देतात हे खरे आहे; परंतु त्यासाठी पुन्हा रुग्णाला प्रयोगशाळेत धाव घ्यावी लागते. एरवीच लांबलचक रांगेत उभे राहून आलेल्या रुग्णांना आणखी थांबावे लागते. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी दोन पर्याय गोमेकॉ प्रशासनाकडे आहेत. एक म्हणजे मुळात चाचणी अहवाल गहाळ होऊच देऊ नये आणि दुसरे म्हणजे ते गहाळ झाले, तर दुहेरी प्रत मिळविण्यासाठी डॉक्टरच्या चिठ्ठीची सक्ती असता कामा नये; परंतु, यापैकी कोणत्याच पर्यायाची अंमलबजावणी अद्याप केलेली दिसत नाही. (प्रतिनिधी)