शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इराणात जप्त करण्यात आलेल्या त्या ब्रिटीश जहाजावर गोमंतकीय अभियंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 18:25 IST

जहाजावर एकूण २३ अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देमागच्या शुक्रवारी एका ब्रिटीश जहाज इराणाच्या समुद्रातून जात असताना ह्या जहाजाला ‘इराणी ट्रुप्स’ ने जप्त केले होते.लवकरच भारतीय दूतावास इराणच्या दूतावासाशी संपर्क करून याच्यावर असलेल्या कामगारांना सोडवण्यासाठी चर्चा करणार अशी माहीती सूत्रांकडून मिळाली आहे.

वास्को - इराणने समुद्रात जप्त केलेल्या ‘स्टेना इम्पेरो’ या ब्रिटीश जहाजावर (ऑइल टँकर) गोव्याच्या वास्को शहरातील एक तरुण चौथा अभियंता म्हणून कामाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या जहाजावर काम करणाऱ्या अभियंत्याचे नाव गोविंद सुरेश नाईक असे असून तो चिखली, वास्को भागातील रहिवाशी आहे.मागच्या शुक्रवारी एका ब्रिटीश जहाज इराणाच्या समुद्रातून जात असताना ह्या जहाजाला ‘इराणी ट्रुप्स’ ने जप्त केले होते. सदर जहाजावर एकूण २३ अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या जहाजावर गोव्याचा गोविंद सुरेश नाईक हा कामाला असल्याची माहिती वास्को शहरात पसरताच त्याच्याबाबत नागरीकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान गोविंद यांचे वडील सुरेश नाईक यांना संपर्क केला असता आपला मुलगा जहाजावर सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. हे जहाज जप्त केल्यानंतर आम्हाला आमच्या मुलाची चिंता लागली होती. परंतू नंतर तो सुरक्षित असल्याचे समजल्यानंतर आमची भीती दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या तीन दिवसापासून गोविंद आमच्याशी मोबाईलवर बोलत असून त्यांने आपण पूर्णपणे येथे सुरक्षीत असल्याची माहीती दिली. सदर ब्रिटीश जहाज जरी ‘इराणी ट्रुप्स’ ने जप्त केले तरी ह्या जहाजावर असलेल्या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास करण्यात येत नसून जेवण इत्यादी सर्व सुविधा वेळेवर मिळत असल्याचे गोविंद ने आम्हाला सांगितले असल्याचे त्यांच्या वडीलाने कळविले. तसेच ज्या जहाजात आमचा मुलगा काम करतो त्या कंपनीने आम्हाला संपर्क करून तो पूर्णपणे सुरक्षीत असल्याची माहीती दिल्याचे गोविंद यांचे वडील सुरेश यांनी सांगितले. लवकरच भारतीय दूतावास इराणच्या दूतावासाशी संपर्क करून याच्यावर असलेल्या कामगारांना सोडवण्यासाठी चर्चा करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गोविंद चौथ्यांदा जहाजावर कामासाठी गेला असून १६ जुलै रोजी तो दुबईहून त्या जहाजावर कामासाठी चढला होता अशी माहिती त्यांचे वडील सुरेश यांनी दिली. आमच्या मुलाला तसेच जहाजावरील इतर अधिकाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास नसून उलट त्यांना चांगल्या पद्धतीने वागवत असल्याची माहीती मिळाल्याने आम्हाला याबाबत समाधान असल्याचे वडील सुरेश म्हणाले. गोविंद यांचे वडील सुरेश नाईक यांचा बायणा, वास्को येथे हॉटेल व्यवसाय असून गोविंदच्या वडीलासहीत त्याची आई, दोन भाऊ व अन्य नातेवाईक तो कधी गोव्यात परततो ह्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी गोव्याच्या अनिवासी भारतीय आयुक्त (एनआरआय) चे चेअरमन नरेंद्र सावईकर यांना संपर्क केला असता त्या जहाजावर असलेला गोमंतकीय पूत्र गोविंद सुरेश नाईक सुरक्षीत रित्या गोव्यात परतवावा यासाठी प्रयत्न चालू केले असल्याची माहिती त्यांनी दिली. अनिवारी भारतीय आयुक्त संचालकाला आपण भारतात असलेल्या इराण दूतावासाला याबाबत पत्र लिहण्यासाठी सांगितले असून गोविंद लवकरच सुरक्षीत गोव्यात परतणार असा विश्वास सावईकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :goaगोवा