शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा बंगालवर विजय

By admin | Updated: July 1, 2016 20:36 IST

क्रिश्मा शिरवईकरच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर गोव्याच्या महिला ज्युनिअर संघाने पश्चिम बंगालचा ३-१ ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी कटक (ओडिशा) येथे सुरु असलेल्या

राष्ट्रीय ज्युनिअर महिला फुटबॉल :क्रिश्माची हॅट्ट्रिक, ३-१ ने मात

पणजी : क्रिश्मा शिरवईकरच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर गोव्याच्या महिला ज्युनिअर संघाने पश्चिम बंगालचा ३-१ ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी कटक (ओडिशा) येथे सुरु असलेल्या ज्युनिअर महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे. ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयोजित केली आहे. कटक येथील बारबती स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गोव्याच्या महिला संघाने आक्रमक सुरुवात केली होती. प्रशिक्षक ज्युलियट मिरांडा यांनी संघाची आखणी ४-४-२ अशा पद्धतीने केली होती. आघाडीपटू क्रिश्मा शिरवईकर आणि सुश्मिता जाधव यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. अविया जीन आणि वेलिना फर्नांडिस यांनी मिडफिल्डवर सफाईदारपणे काम केले. गोव्याने बंगालवर दबाव निर्माण केला होता. याच संधीचा फायदा उठवत ३२ व्या मिनिटाला संधी प्राप्त केली. त्यानंतर ४० व्या मिनिटाला क्रिश्माने अ‍ॅनलीकडून आलेल्या पासवर गोल नोंदवला आणि आघाडी २-० वर नेली. लेमन ब्रेकनंतर पश्चिम बंगालने चेंडूवर अधिक वर्चस्व मिळवले होते. मात्र, गोव्याचा तितकाच आक्रमकपणा कायम होता. ८३ व्या मिनिटाला वेलीना हिने क्रिश्माकडे चेंडू पास केला. यावर कोणतीही चूक न करता क्रिश्माने आपली हॅट्ट्रिक साधणारा गोल नोंदवला. या गोलमुळे गोव्याने ३-१ असे विजयावर शिक्कामोर्तब केले. आता गोव्याचा पुढील सामना केरळविरुद्ध ५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता होईल.