शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील एक शिक्षिकी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षित गोवा पहिल्या तीनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 19:12 IST

मागच्या 30 वर्षात पटसंख्येअभावी तब्बल 367 शाळा बंद; यंदा 24 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर

 

मडगाव: शिक्षणाचा स्तर गोव्यात वरचा असला तरी सरकारी प्राथमिक विद्यालयाकडे विद्याथ्र्याचा जाण्याचा कल दिवसेंदिवस कमी होत असल्याने देशातील एक शिक्षिकी शाळात गोव्याचा क्रमांक आता पहिल्या तीन राज्यामध्ये लागू लागला आहे. हल्लीच प्रसिद्ध झालेल्या नीती आयोगाच्या अहवालाप्रमाणो गोव्यासह अरुणाचल प्रदेश व झारखंड येथे एक शिक्षिकी शाळांची टक्केवारी देशात सर्वात अधिक आहे.देशाच्या शैक्षणिक धोरणाप्रमाणो प्राथमिक शाळेत 24 विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास दुसरा शिक्षक मिळू शकतो. 2019—20 या शैक्षणिक वर्षात गोव्यातील तब्बल 108 सरकारी शाळांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी असून कमी विद्याथ्र्याच्या पटसंख्येमुळे 2018 साली 15 सरकारी शाळा बंद करण्यात आल्या. मागच्या वीस वर्षाच्या कालावधीत गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळांची संख्या 921 वरुन 753 एवढी खाली उतरली आहे.1989 पासून सरकारी प्राथमिक शाळांतील पटसंख्या कमी होत असून आतार्पयत त्यामुळे 367 शाळा बंद कराव्या लागल्या अशी माहिती सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात पुढे आली असून सध्या गोव्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या पाचपेक्षा कमी असल्याने यंदा 24 सरकारी प्राथमिक शाळा बंद पडू शकतात. विद्यार्थी सरकारी प्राथमिक शाळांकडे पुन्हा आकर्षित व्हावेत यासाठी प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची या शाळांमध्ये नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षण खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिली.