शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई यांची तीन तास चौकशी

By admin | Updated: September 30, 2016 18:49 IST

गोवा क्रिकेट असोसिएशनमधील ३ कोटी १३ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अध्यक्ष चेतन देसाई यांची शुक्रवारी सकाळी आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिसांनी तब्बल तीन तास चौकशी केली.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ३० : गोवा क्रिकेट असोसिएशनमधील ३ कोटी १३ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अध्यक्ष चेतन देसाई यांची शुक्रवारी सकाळी आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिसांनी तब्बल तीन तास चौकशी केली. त्यांच्या पत्नीलाही दुसऱ्यांदा जबानीसाठी बोलावण्यात आले आहे. चेतन यांनी २ कोटी ४८ लाख रुपयांच्या ज्या कायम ठेवी बँकेत ठेवलेल्या आहेत त्यासाठी पैसे आणले कुठून याची चौकशी पोलिस करीत आहेत. याबाबतीत खुलासा करण्यासाठी त्यांना सोमवारपर्यंत मुदत दिलेली आहे.

आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिस अधिक्षक प्रियांका कश्यप यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, कायम ठेवींसाठी पैसे कुठून आणले याबाबत चेतन हे समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाहीत तसेच त्यांनी कोणतेही दस्तऐवजही सादर केलेले नाहीत. काही वेळ मागून घेतल्याने सोमवारपर्यंत दस्तऐवज सादर करण्यासाठी त्यांना मुदत दिलेली नाहे. कायम ठेवींबाबत सर्व व्यवहार रोखीने झालेले आहेत त्यामुळे हे पैसे कुठून आणले याचा खुलासा त्यांनी करावाच लागेल. जीसीएतील घोटाळ्याचा हा पैसा आहे का, याची कसून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आठ वेगवेगळ्या कायम ठेवींमध्ये १ कोटी ४८ लाख रुपये गुंतविण्यात आले आहेत. या आठही कायम ठेवी पत्नीच्या नावे आहेत तर कन्येच्या नावाने १ कोटी रुपयांची कायम ठेव आहे. जानेवारी-फेब्रुवारी २0१५ मध्ये या ठेवी ठेवण्यात आल्या परंतु नंतर रक्कम मुदत संपण्याआधीच काढण्यात आल्या. हे पैसे आले कुठून याचा स्रोत पोलिसांना जाणून घ्यायचा आहे. २00७-0८ मध्ये जीसीएमधील घोटाळ्यांशी या रकमेचा संबंध आहे का, याची चौकशी केली जात आहे.

भारतीय क्रिकेट असोसिएशनने (बीसीसीआय) गोवा क्रिकेट असोसिएशनला टेलिव्हिजनच्या हक्कापोटी दिलेल्या निधीत २ कोटी ८७ लाख रुपयांचा घोटाळा झाला होता. अस्तित्त्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने या तिघांनी जीसीएच्या बॅकेमधील खात्यातून २६ लाख रुपये काढल्याचा आरोप आहे.