काणकोण : मार्च महिन्यात काणकोण नगरपालिका कार्यालयासमोरील नगरपालिकेच्या भाजी मार्केटला आग लागून झालेल्या नुकसानीतील ज्यांचे नुकसान झाले आहे अशा व्यापार्यांनी नुकसानीची बीले माल घेतलेल्या होलसेल व्यापार्यांकडून आणून तलाठ्याजवळ त्वरित द्यावीत. जेणेकरुन नुकसानभरपाई देण्यास गती येईल असे उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकारी सुदीन नातू यांनी या व्यापार्यंाच्या शिष्टमंडळाला सांगितले.क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यासमवेत मंगळवारी उपजिल्हाधिकार्यांसमवेत बैठक झाली त्या बैठकीत नुकसानग्रस्त व्यापार्यांनी आपली कैफियत मांडली व आग लागलेल्या मार्केटमधील जळलेले कपडे, चप्पल व इतर साहित्य काढून त्या मार्केटात पुन्हा व्यापार करण्यास परवानगी द्यावी अशी उपजिल्हाकिार्याशी मागणी केली. दोनदा आग लागलेल्या या मार्केट प्रकल्पाची इमारत मजबूत आहे की नाही याचा अहवाल फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राव यांच्याकडून आल्यावरच काय तो निर्णय घेण्यात येईल तोपर्यत व्यापार्यांनी पालिकेच्या इमारतीमागील बाजूच्या खुल्या जागेत व्यापार करावा असे सांगितले. (प्रतिनिधी)
आगग्रस्त व्यापार्यांनी बिले त्वरित द्या: उपजिल्हाधिकारी
By admin | Updated: May 8, 2014 01:25 IST