शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

चिन्ह मिळवा; मगच युती!

By admin | Updated: December 29, 2016 02:03 IST

पणजी : गोवा सुरक्षा मंच पक्षाने अगोदर निवडणूक आयोगाकडून चिन्ह प्राप्त करावे; मगच मगो पक्ष गोवा सुरक्षा मंचसोबत

पणजी : गोवा सुरक्षा मंच पक्षाने अगोदर निवडणूक आयोगाकडून चिन्ह प्राप्त करावे; मगच मगो पक्ष गोवा सुरक्षा मंचसोबत युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेईल, असे ‘मगोप’चे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे सांगितले. आर्चबिशप पॅलेसवर झालेल्या एका सोहळ्यानंतर आमदार ढवळीकर यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला. सुभाष वेलिंगकर यांच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचने स्थापन केलेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाशी युती होऊ शकते काय, असे विचारले असता, ढवळीकर म्हणाले की, आम्ही अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही; कारण गोवा सुरक्षा मंचला अजून चिन्हही मिळालेले नाही. मगो पक्षाकडे सिंह ही लोकप्रिय निशाणी आहे. गोवा सुरक्षा मंचला चिन्ह मिळाल्यानंतर मगच काय तो विचार करता येईल. त्यानंतरच युतीबाबत काय तो निर्णय घेता येईल. यापुढे खूप गोष्टी घडायच्या आहेत. एकदा निवडणूक आचारसंहिता लागू झाली की, बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडतील. गोवा सुरक्षा मंचची आमच्यासोबत युती झाली नाही, तर तो पक्ष ‘मगोप’मध्ये विलीन करण्याचाही पर्याय खुला आहे, असे संकेत ढवळीकर यांनी दिले. अपक्ष आमदारदेखील चालणार नाहीत. अपक्ष आमदारांनीदेखील दुसऱ्या एखाद्या पक्षात प्रवेश करायला हवा, असे ढवळीकर म्हणाले. या वेळी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हेही उपस्थित होते. खंवटे यांना आपण ‘मगोप’मध्ये प्रवेश करा, असे म्हणत नाही; पण त्यांनीदेखील येत्या निवडणुकीवेळी एखाद्या पक्षात प्रवेश करावा, असे आपण सुचविले असल्याचे ढवळीकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)