पणजी : आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेली गोवा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक हंगामी अध्यक्ष डॉ. साळकर यांनी माघार घेतल्यामुळे बिनविरोध ठरली. मात्र, या निवडणुकीचा निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. त्यामुळे विजेत्या चेतन देसाई गटाला ताबा मिळवता आला नाही. आता सोमवारी (दि.६) न्यायालयातर्फे या निकालाची औपचारिक तसेच अधिकृत घोषणा करण्यात येईल. गेल्या २८ जून रोजी झालेल्या निवडणुकीतून साळकर यांनी सर्वांना धक्का देत माघार घेतली होती. त्यामुळे प्रतिस्पर्धी चेतन देसाई यांचा गट बिनविरोध निवडून आला होता. त्याआधी, साळकर यांनी चेतन देसाई यांच्याविरुद्धच्या पोलीस तक्रारी तसेच याचिकासुद्धा मागे घेतली होती. वकिलांमार्फेत त्यांनी न्यायालयात तसे लेखी पत्र सादर केले. साळकर यांच्या या निर्णयानंतर निवडणुकीच्या निकालाबाबत केवळ औपचारिकता उरली होती. (क्रीडा प्रतिनिधी)
‘जीसीए’ निवडणुकीचा आज निकाल
By admin | Updated: July 6, 2015 00:55 IST