शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बांबोळी ते वेर्णापर्यंत चार उड्डाण पूल

By admin | Updated: January 10, 2015 01:24 IST

सहा पदरी जुवारी पुलाचा मार्ग मोकळा

पणजी : जुवारी नदीवर सहा पदरी पूल बांधला जाणार आहे. त्यासाठीची जागा निश्चित करण्यात आली आहे. हा पूल बांधतानाच बांबोळी ते वेर्णापर्यंतच्या पट्ट्यात एकूण चार उड्डाण पूल बांधले जाणार आहेत. एकूण चौदाशे कोटी रुपये खर्चाचा हा सारा प्रकल्प आहे, अशी माहिती बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना दिली. मंत्री ढवळीकर म्हणाले की, येत्या २२ व २३ रोजी दिल्लीत एक बैठक होत असून त्या वेळी आम्ही जुवारीबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणार आहोत. सहा पदरी जुवारी पुलासाठी जागा निश्चित झाली आहे. केंद्रीय मंत्रालय फक्त आमच्या अहवालासाठी थांबले आहे. एकदा सविस्तर अहवाल मंजूर झाल्यानंतर लगेच निविदा जारी केली जाईल. बांबोळी ते वेर्णापर्यंतच्या उड्डाण पुलांमुळे वाहतूक कोंडीची सारी समस्या सुटेल. नुवे जंक्शन ते बेतूल-धर्मापूर असा रस्ता बांधला जाईल. काणकोणचे गालजीबाग व तळपण हे पूलही यापुढे बांधले जाणार आहेत. खांडेपार पुलासाठी निविदा जारी झाली असून येत्या महिन्यात कामाचा आदेश दिला जाईल. मंत्री ढवळीकर म्हणाले की, गोव्याला प्रथमच ‘पंतप्रधान सडक सुरक्षा’ योजनाही लागू झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक रस्ते सुधारतील. राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी गोव्याला ११० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच लहानसहान जोडरस्त्यांच्या कामांसाठी ९९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. चौपदरी ढवळी बायपास मार्गही फोंडा व परिसरातील वाहतुकीत फार मोठा बदल घडवून आणेल. तिथेही उड्डाण पूल बांधले जाणार आहेत. दाबोळी विमानतळ ते सडा या मार्गाचेही काम होणार आहे. (खास प्रतिनिधी)