शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

हरमल येथे स्टोअर रूमला आग लागून १७ लाखांचे नुकसान

By admin | Updated: July 22, 2014 07:31 IST

हरमल : येथील खालचावाडा बाखिया भाटात एका स्टोअररूमला शनिवारी १९ रोजी पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याने अंदाजे १७ लाखांचे नुकसान झाले.

हरमल : येथील खालचावाडा बाखिया भाटात एका स्टोअररूमला शनिवारी १९ रोजी पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याने अंदाजे १७ लाखांचे नुकसान झाले. पूर्ववैमनस्यातून ही आगीची घटना घडली असावी, असा अंदाज असून पुढील तपास सुरू आहे. याबाबत माहिती अशी, १९ रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास किनारपट्टीत बाखिया भाटात शॅक्स, हट्स व्यावसायिक विनायक कुडव यांच्या स्टोअररूमला अज्ञाताने आग लावल्याने संपूर्ण ३० मी. लांब व १४ मी. रूंदीची स्टोअररूम व त्यातील सुमारे १७ लाखांचे किंमती सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. स्टोअररूममध्ये शॅक्स, हट्सचे बांबू, मॅट्स, डेकबेड, टेबल्स, खुर्च्या, उंची गाद्या, लाकडी पलंग, चादरी, किचन भांडी, सामान पाईप्स, काउंटर, वीज लॅम्पस, प्लायवुड्स, इटालियन वुड्स, खुर्च्या, प्लम्बिंग सामान असे अंदाजे १७ लाखांचे सामान जळून खाक झाले. पर्यटन हंगामात सुमारे १५ हट्स व एक रेस्टॉरंट उभारलेले असते, त्याचे सामान व्यवस्थित आच्छादून प्रतिवर्षीप्रमाणे त्याच ठिकाणी ठेवले होते. गेल्यावर्षी पावसाळ्यात सुरूचे झाड पडून स्टोअररूमचा काही भाग जमीनदोस्त झाला होता, असे कुडव यांनी सांगितले. आगीच्या ज्वाला इतक्या दाहक होत्या की, अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविणेही कठीण झाले. अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यापूर्वी अर्ध्याअधिक सामानाने पेट घेतला होता. पेडणे व म्हापशाहून अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. आगीत सॅनिटरी सामान, टबस्चा आवाज फुटल्यानंतर मोठ्याने ऐकू येत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. शिवाय भटवाडी येथून खासगी विहिरीचे पाणी दलाच्या जवानांनी आणले होते. पोलीस निरीक्षक लोटलीकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)