शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

...अखेर इराणमधून सुटका

By admin | Updated: January 20, 2015 02:14 IST

गोव्याचे दोघे अभियंते : चौदा महिन्यांनंतर झाली घरच्यांची भेट

पणजी : गोव्यातील पै काणे समूहाच्या पावर इंजिनिअरिंग (इंडिया) प्रा. लिमिटेड या उद्योगातील दोघा अभियंत्यांची चौदा महिन्यांनंतर अखेर इराणमधून सुटका झाली असून सोमवारी ते भारतात परतले. संकेत दिनेशचंद्र पांड्या व महम्मद खान हे काणे यांच्या पावर इंजिनिअरिंग (इंडिया) प्रकल्पाचे अभियंते आहेत. संकेत हे बडोदा, तर महम्मद हे नवी दिल्लीतील आहेत. इराणमध्ये वजर जहान या कंपनीच्या १६ मेगावॅट वायू आधारित वीज प्रकल्पासाठी वीज साहित्य पुरविण्याचे काम पै काणे यांच्या पावर इंजिनिअरिंग लिमिटेडला मिळाले होते. संकेत व खान हे दोघे अभियंते हे साहित्य घेऊन इराणमध्ये गेले होते. तिथे त्यांच्यावर वजर जहान कंपनीने फसवणुकीचे व अन्य काही गंभीर आरोप केले. न्यायालयात खटलाही भरला गेला व त्यामुळे चौदा महिने दोघे अभियंते इराणमध्ये अडकून पडले. पै काणे कंपनीने त्याविरुद्ध कायदेशीर लढा दिला व या दोघाही अभियंत्यांची आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर पोहचले. नंतर त्यांनी आपले घर गाठले. चौदा महिन्यांनंतर दोघे स्वत:च्या कुटुंबास येऊन मिळाल्याचे पावर इंजिनिअरिंग कंपनीचे मालक अतुल पै काणे यांनी सोमवारी सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र सरकारच्या यंत्रणा, गोवा सरकार, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, तसेच भारतातील इराणचे राजदूत आदी अनेकांनी मोलाचे सहकार्य केल्याने आमचा संघर्ष यशस्वी झाला, असे काणे यांनी सांगितले. संकेत व महम्मद यांना एकही रात्र तुरुंगात राहावे लागले नाही. त्यांना न्यायालयीन खटल्यांमुळे इराणबाहेर जाता येत नव्हते. चौदा महिने त्यांना एका तारांकित हॉटेलमध्ये राहावे लागले. तिथे राहून ते बरेच काही शिकले. महम्मद हा पोहायला शिकला, असे काणे यांनी सांगितले. इराण देशातील लोक खूप चांगले आहेत. आम्ही त्या देशाशी असलेले आमच्या कंपनीचे व्यापार संबंध तोडणार नाही. आमच्या अभियंत्यांवर ज्या कंपनीने खोटे आरोप केले, त्यांच्याशी आम्हाला संबंध ठेवायचे नाहीत. ती कंपनी आमच्याकडून पैसे उकळू पाहत होती, असे काणे म्हणाले. आमच्याजवळ एकूण ४०० कर्मचारी असून विविध देशांमध्ये आमचे कर्मचारी फिरतात; पण कधीच अशा प्रकारचा अनुभव कधी आला नव्हता, असे काणे यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)