शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम निवाड्यापर्यंत नवदुर्गेची मूर्ती कायम

By admin | Updated: April 21, 2016 01:47 IST

फोंडा : मडकईतील श्री नवदुर्गा देवीची मूर्ती बदलण्यासंदर्भात अंतिम निकाल येईपर्यंत देवस्थान समितीने मूर्ती बदलू नये. तसेच ग्रामस्थांनीही

फोंडा : मडकईतील श्री नवदुर्गा देवीची मूर्ती बदलण्यासंदर्भात अंतिम निकाल येईपर्यंत देवस्थान समितीने मूर्ती बदलू नये. तसेच ग्रामस्थांनीही देवस्थान समितीच्या व्यवस्थापकीय कामकाजात हस्तक्षेप करू नये, असा अंतरिम निवाडा फोंडा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांनी बुधवारी दिला. या प्रकरणासंदर्भातील पुढील सुनावणी येत्या ७ मे रोजी ठेवण्यात आली आहे. याबाबत बोलताना श्री नवदुर्गा प्रतिष्ठानचे वकील अ‍ॅड. अमृत कासार म्हणाले की, हा फक्त अंतरिम निवाडा आहे. अजून यासंदर्भात अंतिम निकाल यायचा असून यापुढे देवस्थान खासगी की सार्वजनिक तसेच अन्य प्रकरणावर हा खटला पुढे चालणार आहे. बुधवारच्या निकालामुळे नवदुर्गा देवीची मूर्ती अंतिम निकाल येईपर्यंत बदलता येणार नाही. तसेच ग्रामस्थांनीही देवस्थानच्या उत्सव व अन्य कार्यात दखल न देण्याचे न्यायालयाने सुचविल्याचे ते म्हणाले. श्री नवदुर्गा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र पणजीकर यांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त करताना हा मडकईकरीण देवीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. या निवाड्यामुळे मडकईत नवदुर्गेचे अस्तित्व टिकून राहाणार असून हा मडकईतील सर्व देवदेवतांचा विजय असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासून सुमारे हजारभर लोक फोंडा (पान ४ वर)