शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट अनुदानाचे प्रमाण ४० लाखांपर्यंत

By admin | Updated: April 15, 2016 02:15 IST

पणजी : गोवा मनोरंजन संस्थेने सुधारित चित्रपट अनुदान योजना तयार केली आहे. गोव्यातील निर्र्मात्यांना चित्रपटांच्या निर्र्मितीसाठी

पणजी : गोवा मनोरंजन संस्थेने सुधारित चित्रपट अनुदान योजना तयार केली आहे. गोव्यातील निर्र्मात्यांना चित्रपटांच्या निर्र्मितीसाठी अगोदर २५ लाखांचे अर्थसाह्य दिले जात होते. आता हे प्रमाण ४० लाख रुपयांपर्यंत वाढवावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मनोरंजन संस्थेने सरकारकडे सुपुर्द केला आहे. सुधारित योजना याच महिन्यात अधिसूचित होईल, असा विश्वास मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष दामोदर नाईक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. नाईक म्हणाले की, चित्रपट अनुदान योजनेत अनेक सुधारणा होणे गरजेचे होते. ती मार्गी लावण्यासाठी मनोरंजन संस्थेने कष्ट घेतले. पूर्ण सुधारित योजना तयार करून सरकारला सादर केली आहे. ४० लाखांपर्यंत अनुदान वाढ आम्ही सुचविली आहे. सरकार त्याविषयी अंतिम निर्णय घेईल. अनुदानाच्या लाभासाठी चित्रपटाचा निर्माता गोमंतकीय असावा, अशी अट लागू करण्यात आली आहे. नाईक म्हणाले की, दोनापावल येथे ज्या जागेत पूर्वी आयटी हॅबिटेट होते, त्या जागेत इफ्फीसाठी साधनसुविधा उभ्या केल्या जातील. त्यासाठी मोठे संकुल साकारेल. त्यासाठी दोनापावलची सुमारे २ लाख १९ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आम्ही सरकारकडून मनोरंजन संस्थेच्या ताब्यात घेतली आहे. या पुढील काळात पुढील काम सुरू होईल. नाईक म्हणाले की, २०१४-१५ साली झालेल्या इफ्फीच्या अनुषंगाने जी विविध बिले मनोरंजन संस्थेकडे आली होती, त्यातील ९० टक्के बिले फेडण्याबाबतचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मनोरंजन संस्थेला आता आयनॉक्सच्या परिसरातील पे पार्किंगद्वारेही महसूल मिळत आहे. पूर्वी हे काम कंत्राटदाराकडे देण्यात आले होते. आता हे काम मनोरंजन संस्था स्वत:च करत आहे. (खास प्रतिनिधी)