शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कूळ कायदा; भाजपवर दबाव

By admin | Updated: May 17, 2015 00:51 IST

पणजी : राज्यातील बहुजन समाज हा भारतीय जनता पक्षाचा पाया होता व आहे. मात्र, कूळ कायदा दुरुस्त करून सरकारने बहुजनांना अस्वस्थ केले.

पणजी : राज्यातील बहुजन समाज हा भारतीय जनता पक्षाचा पाया होता व आहे. मात्र, कूळ कायदा दुरुस्त करून सरकारने बहुजनांना अस्वस्थ केले. या दुरुस्त्या महागात पडणार असल्याने त्या मागे घेणे राजकीयदृष्ट्या योग्य ठरेल, याची जाणीव भाजपच्या काही आमदारांनी पक्षाचे केंद्रीय सहसंघटन मंत्री सतिश वेलणकर यांना दिली.आमदारांची मते आणि सूचना ऐकून भाजपवर एक प्रकारे कूळ कायदा दुरुस्त्यांप्रश्नी दबाव आला आहे. या दुरुस्त्या रद्द होणे गरजेचे आहे, याची जाणीव पक्षाला होऊ लागली आहे. दोन दिवस अनेक आमदारांकडे वेलणकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चर्चा केली. म.गो.पक्षाविषयीही वेलणकर व पर्रीकर यांच्याशी काही आमदार बोलले. सांतआंद्रेचे आमदार विष्णू वाघ हे वेलणकर यांच्याजवळ जास्त स्पष्ट बोलले.राज्यात विविध समाजांचा मिळून बहुजन महासंघ स्थापन झाला आहे. कूळ कायद्यातील दुरुस्त्यांमुळे बहुजन समाज दुखावला आहे, असा मुद्दा वाघ यांनी मांडला. कूळ कायद्याला सरकारने हात लावू नये, तळागाळातील लोक संतप्त बनतील असे मी पूर्वीपासून सांगत होतो. आता तोच अनुभव येऊ लागला आहे. केवळ सनसेट कलमच नव्हे तर कूळ कायद्यात भाजप सरकारने केलेल्या सगळ््याच दुरुस्त्या मागे घ्याव्यात, असा मुद्दा वाघ यांनी मांडला. पर्रीकर यांच्यासमोरही त्यांनी हाच मुद्दा मांडला. न्यायालयाकडे खटले सोपविणे चुकीचे आहे, असे वाघ म्हणाले. आपल्याला कोणताही अहंकार नाही, कूळ कायद्यातील दुरुस्त्यांबाबत फेरविचार करता येईल, असे पर्रीकर यांनी वाघ यांना सांगितले. वाघ, मायकल लोबो वगैरे शनिवारीच वेलणकर व पर्रीकर यांना भेटले. (खास प्रतिनिधी)