शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

माहितीची देवाण-घेवाण वॉट्सअ‍ॅपमधून नको!

By admin | Updated: January 7, 2015 01:27 IST

प्रशासकीय अधिकाऱ्यांना आयटी तज्ज्ञांचा सल्ला

पणजी : सरकारी खात्यातील गोपनीय माहिती एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देताना वॉट्सअ‍ॅप ग्रुपचा वापर करू नका असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि सायबर सल्लागार वकुल शर्मा यांनी गोव्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. माहिती तंत्रज्ञान खात्याच्या ई-गव्हर्नन्स परिषदेत बोलताना वकुल शर्मा यांनी हा सल्ला दिला. ते म्हणाले की ज्या अ‍ॅप्सचे सोर्स देशाबाहेर आहेत त्यावर विसंबून राहू नका, वॉट्सअ‍ॅप हे विदेशातून चालविले जाते. वॉट्सअ‍ॅपवरील माहिती गोपनीय राहत नसल्याच्याही अनेक तक्रारी आहेत. तसेच पोलीस तपासालाही वॉट्सअ‍ॅप सहकार्य करीत नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे गोपनीय माहितीची वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देवाणघेवाण करणे जोखमीचे असल्याचे ते म्हणाले. सायबर गुन्हे विषयावर बोलताना आयटी सल्लागार रक्षीत टंडन यांनीही वॉट्सअ‍ॅप सहीत सर्वच विदेशी आणि देशीही सॉफ्टवेअरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. टोरंट्स व इतर अ‍ॅप्सच्या माध्यमातून मालवेरर्स आणि इतर व्हायरस पसरत असतात. आपल्या संगणकावरील, मोबाईलवरील गोपनीय माहितीही ते मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. ई-मेल वापरताना एनआयसीचा सोर्स असलेला ई-मेल वापरणे कमी जोखमीचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अत्यंत कठीण असे पासवर्ड टाकणे, पासवर्ड वारंवार बदलणे या गोष्टी सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)