शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सर्वाना मुक्त प्रवेश मिळणार; ताप असल्यासच चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:58 IST

गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी होणार नाही, तापासारखी लक्षणे दिसली तरच चाचणी

पणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांचे येणो सुरू झाले आहे. रेल्वे, विमाने किंवा रस्तामार्गे जे लोक गोव्यात येतील, त्यांना यापुढे मुक्त प्रवेश मिळणार आहे. यापुढे नवी प्रक्रिया (एसओपी) लागू होणार आहे. त्यानुसार गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी होणार नाही, तापासारखी लक्षणे दिसली तरच चाचणी केली जाणार आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सकाळी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. मांगोरहीलच्या प्रकरणामुळे कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढतात व दुसऱ्या बाजूने सगळे व्यवहारही सुरू होत असल्याने परराज्यातून बरेच प्रवासी गोव्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री व आमदारांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. कडक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा बहुतेक मंत्र्यांनी व्यक्त केली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी वास्कोत पूर्ण लॉकडाऊन केले जावे असा मुद्दा मांडला. मात्र आरोग्य मंत्री विश्वजित राणे, विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी वेगळी भूमिका मांडली. एका विशिष्ट भागात कोरोना रुग्ण आढळले म्हणून पूर्ण शहरात लॉकडाऊन करण्याची गरज नाही. तसे झाल्यास लोक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत येतील, सगळे व्यवहार कायम बंद ठेवणे योग्य नव्हे असे लोबो व राणे म्हणाले.नवीन एसओपी येणारयापुढे राज्यात नवीन एसओपी लागू करण्याचे मंत्र्यांच्या बैठकीत तत्त्वत: ठरले आहे. गोव्यात रेल्वे, रस्तामार्गे किंवा विमानातून जे कुणी येतील, त्या सर्वाची सध्या चाचणी केली जाते पण यापुढे अशा प्रवाशांना फक्त थर्मल स्कॅनरमधून जावे लागेल. जर कुणाला ताप आहे असे आढळले तरच कोविद चाचणी केली जाईल. थर्मल गनने प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासले जाणार नाही, असे मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. दरम्यान, आरोग्य सचिव श्रीमती निला मोहनन यांनी मात्र अजून याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही, विविध चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट केले.