शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

एल्वीस गोम्स लढणार ‘आप’तर्फे कुंकळ्ळीतून

By admin | Updated: September 28, 2016 01:58 IST

कुंकळ्ळी : राजकारणात येण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा देणारे एल्वीस गोम्स आपल्या जन्मगावातून म्हणजेच कुंकळ्ळी

कुंकळ्ळी : राजकारणात येण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा देणारे एल्वीस गोम्स आपल्या जन्मगावातून म्हणजेच कुंकळ्ळी मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरणार आहेत. गोम्स यांना ‘आप’चा चेहरा म्हणून गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्यात येणार आहे. ‘आप’च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोम्स ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. डॉ. आॅस्कर रिबेलो यांनी व्यक्तिगत व व्यावसायिक कारणास्तव निवडणुकीत प्रत्यक्ष उतरण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे गोम्स यांना मुख्यामंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्याचे ‘आप’ने ठरविले आहे. एल्वीस गोम्स हे कुंकळ्ळीचे सुपुत्र असून कुंकळ्ळी युनियन या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. गोम्स निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे कुंकळ्ळी मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात सध्या भाजपचे राजन नाईक हे आमदार असून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर क्लेफासियो डायस, देवेंद्र देसाई, जॉन मोन्तेरो व ज्योकिम आलेमाव यांनी दावा केला आहे. गोम्स यांचा स्वत:चा चाहता वर्ग असून ‘आप’नेही या मतदारसंघात बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात गोम्स यांना मतदारांचा पाठिंबा लाभण्याची शक्यता आहे. गोम्स यांना तरुणांचा पाठिंबा लाभत असून पारोडा, आंबावली, गिरदोली, चांदर, माकाझन व बाळ्ळी पंचायत क्षेत्रातील मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी झाल्यास ‘आप’ या मतदारसंघात करामत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोम्स यांच्या येण्याने आलेमाव व डायस यांचे धाबे दणाणले आहेत. गोम्स समर्थकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, ते गांधी जयंतीपासून म्हणजेच २ आॅक्टोबरपासून प्रचार कार्यास सुरुवात करणार आहेत. ‘आप’ने कुंकळ्ळी मतदारसंघात प्रचार कार्यालय थाटले असून अनेक कार्यकर्त्यांची फौज ‘आप’मधे सहभागी झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी गोम्स यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. गृहनिर्माण भूखंड घोटाळ्यात हात असल्याच्या संशयावरून भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. (प्रतिनिधी)