शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

Election Results Live - गोव्यात सत्ता समीकरणाचा सस्पेन्स, काँग्रेस आघाडीवर

By admin | Updated: March 11, 2017 09:36 IST

गरज भासल्यास भाजपाला साथ देण्याची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तयारी दाखवल्याने गोव्यातल्या सत्ता समीकरणाचा सस्पेन्स वाढला आहे

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 11 - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या  विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला काँग्रेसने सहा जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा दोन जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात नेमकं काय होत याकडेही सर्वांचं लक्ष असून भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर येते का नाही हे पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेनं महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी युती केली होती. त्यामुळे गोव्यात किंगमेकर नेमका कोण होणार हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
निकाल हाती येण्याआधी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं. यावेळी बोलताना  देवाची इच्छा असेल तर पुन्हा नक्कीच मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे गरज भासल्यास भाजपाला साथ देण्याची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याने गोव्यातल्या सत्ता समीकरणाचा सस्पेन्स वाढला आहे. 
 
40 सदस्यांच्या गोवा विधानसभेमध्ये बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहेत. इंडिया टीवी सी वोटरच्या अंदाजानुसार गोव्यामध्ये भाजपाला 15 ते 21, काँग्रेसला 12 ते 18 आणि आम आदमी पक्षाला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. अन्य पक्षांना 2 ते 8 जागा मिळतील. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये छोटया पक्षांना महत्व येणार आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना या तीन पक्षांनी आघाडी करुन निवडणूक लढवली आहे. 
 
गोव्यात एकूण 40 जागा आहेत. सध्या भाजपकडे 21 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 7 जागा. त्यामुळे आता या निवडणुकीत गोवेकर कोण्याच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहावं लागेल.