शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

Election Results Live - पाच राज्यांमधील निकालावर काँग्रेसचा बी प्लान

By admin | Updated: March 11, 2017 08:54 IST

काँग्रेस जरी एक्झिट पोलनंतरही आपल्याच विजयाचा दावा करत असली तरी त्यांनी बी प्लान तयार ठेवला असून आपला बचाव सुरु केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - काँग्रेसने उत्तरप्रदेशसहित पाच राज्यांमधील एक्झिट पोलला नाकारात आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी एक्झिट पोलच्या आकड्यांवर बोलायचं टाळलं असून उत्तरप्रदेशात समाजवादी आणि आपल्या युतीचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्ये उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात असल्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर काही बोलू शकत नाही असं सांगितलं. राहुल गांधी बोलले आहेत की, 'एक्झिट पोलची परिस्थिती बिहारसारखी होईल. आमची युती जिंकत आहे. असे एक्झिट पोल आम्ही बिहारमध्येदेखील पाहिले आहेत. यावर उद्या बोलू'.
 
काँग्रेस जरी एक्झिट पोलनंतरही आपल्याच विजयाचा दावा करत असली तरी त्यांनी बी प्लान तयार ठेवला असून आपला बचाव सुरु केला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने उत्तरप्रदेशात सरकार बनवण्यासाठी सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध असल्याचं कबूल केलं आहे. काँग्रेसने विजय - पराभवावर बोलताना कोणाचाही विजय झाला तरी ख-या अर्थाने हा भारतीय मतदाराचा विजय असेल असं सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
 
सरकार बनवण्याचा प्रयत्न करणार - 
काँग्रेसने गरज पडल्यास समाजवादी - काँग्रेस युती सरकार स्थापन करण्यासाठी बहुजन समाज पक्षाला मदत करेल असे संकेत दिले आहेत. काँग्रेसने मात्र ही काल्पनिक परिस्थिती असून राजकारणात गरज पडल्यास असंही होऊ शकतं असं सांगितलं आहे. त्यावेळी असणा-या परिस्थितीत जे शक्य असेल ते करण्यात येईल असं काँग्रेसने सांगितलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील जातीय ताकदींना रोखण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. अखिलेश यांनी मायावती यांचं नाव न घेता सांगितलं आहे की, गरज पडल्यास याचा विचार केला जाऊ शकतो.  
 
एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची पिछेहाट होताना दिसल्यावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी धर्मनिरपेक्ष एकतेचा पत्ता खोलला. जातीय ताकदींना रोखायचं असेल तर धर्मनिरपेक्ष ताकदींना एकत्र येण्याची गरज असल्याचं अखिलेश यादव बोलले आहेत. मायावतीच्या बहुजन समाज पक्षाकडे त्यांचा सरळ इशारा होता. 
 
हे पोल जाहीर होत असतानाच अखिलेश यादव यांनी आम्ही उत्तर प्रदेशात कदापि भाजपाचे सरकार बनू देणार नाही, त्यासाठी प्रसंगी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीशी समझोता करू, असे बीबीसीला सांगितले आहे. याचाच अर्थ सपाला बहुमत मिळणार नाही, हे जणू त्यांनी मान्यच केल्याचे दिसते.
 
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांपैकी केवळ गोव्यात आता भाजपाचे सरकार होते. तिथे तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल व्यक्त करीत आहेत. पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर भाजपा सत्तेत होती. पण तिथे दोन्ही पक्ष दणकून मार खातील आणि काँग्रेस व आप यांच्यापैकी एकाला बहुमत मिळेल, असे हे पोल सांगतात. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षाला ११0 ते १६९च्या दरम्यान जागा मिळतील, असे हे पोल म्हणतात. तिथे भाजपाला १५५ ते २१0च्या दरम्यान जागा मिळतील, असे या सर्व्हेवरून दिसते. केवळ एकाच पोलमध्ये तिथे भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी अन्य पोलनुसार भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, पण बहुमत मात्र मिळणार नाही, असे दिसते. मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण तो पक्ष तिथे मागे पडेल, असे पोल सांगतात. म्हणजेच आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर ईशान्येकडील आणखी एका राज्यात भाजपा शिरकाव करेल.