शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचा गजर सुरू

By admin | Updated: September 17, 2016 02:17 IST

पणजी : विधानसभा निवडणुकीनिमित्ताने भारतीय भाषा सुरक्षा मंच व भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपच्या बैठकांचे सत्र आजपासून सुरू होत आहे.

पणजी : विधानसभा निवडणुकीनिमित्ताने भारतीय भाषा सुरक्षा मंच व भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपच्या बैठकांचे सत्र आजपासून सुरू होत आहे. पुढील काही महिने भाजप कार्यकर्त्यांना विविध उपक्रम देत निवडणुकीच्या कामात गुंतवून ठेवणार आहे. दुसऱ्या बाजूने भाषा सुरक्षा मंचने राजकीय पक्ष स्थापनेच्या निर्णयावर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले व मातृभाषा रक्षणासाठी या निवडणुकीत भाजप हाच आपला प्रमुख शत्रू असल्याचे जाहीर केले आहे. सत्ताधारी भाजपचा पराभव करण्याच्या हेतूने काय करता येईल, याविषयी भारतीय भाषा सुरक्षा मंचने विचार केला असून भाभासुमंच्या नव्या राजकीय पक्षाची ध्येयधोरणे व घटना याचा मसुदा मंजूर झाला आहे. भाजपविरुद्धची तपशीलवार रणनीती येत्या २ आॅक्टोबर रोजी जाहीर केली जाईल, असे भाषा सुरक्षा मंचने शुक्रवारी येथे जाहीर केले. भाषा सुरक्षा मंचच्या केंद्रीय समितीची शुक्रवारी बांबोळी-कुजिरा येथे बैठक झाली. भाषा सुरक्षा मंचने राजकीय पक्ष स्थापन करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब केले. तसेच पक्ष नोंदणीचे काम पुढे नेण्यास अ‍ॅड. हृदयनाथ शिरोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या समावेशाने स्थापलेल्या पथकाला सांगितले. म.गो. पक्षाला आम्ही दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करावे म्हणून जी चळवळ सुरू आहे, ती यापुढे अधिक आक्रमक व व्यापक केली जाईल. म.गो. पक्षाने त्यासाठी भाजपशी युती तोडून भाषा सुरक्षा मंचसोबत यावे. शिवसेना व प्रजा पार्टीने आम्हाला पाठिंबा (पान ४ वर)