शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

वाहन अपघातांत चार महिन्यांत 97 ठार, 85 अल्पवयीन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 20:06 IST

एकूण 1213 वाहन अपघातांची नोंद चार महिन्यांत झाली, अशी माहिती पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे.

पणजी : राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण गेल्या चार महिन्यांत थोडे गंभीरच राहिले. एकूण 97 व्यक्तींचे जीव जानेवारी ते दि. 30 एप्रिल 2019 पर्यंतच्या कालावधीत गेले. पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहतूक नियम भंग करणा-यांविरुद्ध विशेष कारवाई मोहीमही चार महिन्यांत राबवली. एकूण 85 अल्पवयीन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. 1791 चालकांविरुद्ध खटले गुदरले गेले.एकूण 1213 वाहन अपघातांची नोंद चार महिन्यांत झाली, अशी माहिती पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे. विविध प्रकारे वाहतूक नियमांचा जे भंग करतात, अशा 1791 चालकांविरुद्ध कारवाई झाली. धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याबाबत 590 चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी खटले दाखल केले. वाहनांमध्ये बदल केल्याने साठजणांविरुद्ध कारवाई केली गेली. 85 अल्पवयीन वाहन चालविताना सापडले, ज्यांच्याकडे वाहतूक परवाना असण्याचा प्रश्नच नव्हता. 1116 चालकांविरुद्ध आक्षेपार्ह लाईटबाबत कारवाई झाली.

पणजीत ट्रकांना बंदी पणजी शहरात सकाळी नऊ वाजल्यानंतर ट्रकांना प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय वाहतूक पोलिस अधीक्षक, वाहतूक खात्याचे अधिकारी, स्मार्ट सिटीशीनिगडीत अधिकारी व पणजी महापालिकेच्या संयुक्त बैठकीत  घेण्यात आला. आमदार बाबूश मोन्सेरात आणि महापौर उदय मडकईकर यांनी मिळून ही बैठक घेतली. पणजी बाजारपेठेत सकाळी नऊनंतर ट्रक येतात तसेच सकाळी आठनंतर येणारे ट्रकही दुपारी बारा वाजेर्पयत तिथेच राहतात. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असे बैठकीत ठरले. पणजीतील हॉटेलांसमोर दोनपेक्षा जास्त पर्यटक वाहने पार्क केलेली असू नयेत. ती वाहने नेऊन सांता मोनिका जेटीकडील बहुमजली पार्किग प्रकल्पात ठेवावी. रेन्ट अ बाईक व्यवसायिक बेकायदा पद्धतीने सगळीकडेच आपली वाहने पार्क करून ठेवतात व यामुळे लोकांना जागाच मिळत नाही. याविरुद्धही कारवाई व्हायला हवी असे बैठकीत ठरल्याचे मडकईकर यांनी सांगितले.

कॅसिनो व्यवसायिकांची बैठक वाहतूक पोलिसांच्या अधीक्षकांकडून लवकरच पणजीतील मांडवी नदीतील कॅसिनो व्यवसायिकांची बैठक घेतली जाईल. सर्व कॅसिनो व्यवसायिकांनी पणजीतील वाहतूक रचना व पार्किग व्यवस्था सुधारावी म्हणून सहकार्य करावे असे अपेक्षित आहे. कॅसिनोंमध्ये जे ग्राहक येतात, त्यांची वाहने बहुमजली पार्किग प्रकल्पातच जायला हवी. तसेच टुरिस्ट हॉस्टेलसमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूला दुचाक्या व अन्य वाहने पार्क केलेली असतात त्याविरुद्धही प्राधान्याने कारवाई केली जाईल. कारण त्या मार्गाने जर कधी अग्नीशामक दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका आणण्याची पाळी आली तर, अशा वाहनाला वावच मिळणार नाही, असे मडकईकर म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघात