शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

सदोष शिक्षणामुळे युवक तणावग्रस्त

By admin | Updated: September 27, 2015 02:54 IST

पणजी : मुलांच्या मनात संस्कारांचे रोपण घरात होते. मात्र, आयुष्यभराची शिदोरी म्हणून शिक्षकच त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत असतात.

पणजी : मुलांच्या मनात संस्कारांचे रोपण घरात होते. मात्र, आयुष्यभराची शिदोरी म्हणून शिक्षकच त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत असतात. शिक्षण व्यवस्थेतील दोषांमुळे नवीन पिढी कायम तणावग्रस्त राहत आहे. नोकरी करण्यासाठी आणखी पर्याय नसल्याने केवळ शेवटचा पर्याय म्हणून नाईलाजास्तव कुणीच शिक्षकी पेशा स्वीकारू नये, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी बीजभाषणातून दिला. दोनापावला येथील डॉ. शामा प्रसाद मुखर्जी सभागृहात ‘एड्युव्हिजन इंडिया २0२0’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ‘पुढील पिढीसाठी दर्जेदार व सर्वंकष शिक्षण’ हा या परिषदेचा विषय आहे. या वेळी सभापती राजेंद्र आर्लेकर, आयोजन समितीचे अध्यक्ष दीपक खैतान, विजय शेट्टी, डॉ. माधवी कामत इत्यादी सभासद उपस्थित होते. गुरुजी म्हणाले, साधारण २५ वर्षांपूर्वी देशात ७0 टक्के कैदी अशिक्षित, तर ३0 टक्के शिक्षित होते. मात्र, परिस्थिती उलट झाली असून सध्या ७३ टक्के कैदी हे शिक्षित आहेत, तर २३ टक्के कैदी अशिक्षित असल्याचा अहवाल आहे. हा शिक्षण व्यवस्थेचा परिणाम म्हणावा लागेल. भारत हा सर्वाधिक युवा असलेला देश आहे. देशाकडे ६0 ते ७0 टक्केयुवाशक्ती असून येथे केवळ २-३ टक्के कौशल्यपूर्ण शिक्षण प्राप्त केलेले युवा आहेत. गोवा हे हुशारी, शिक्षण, सुसंवाद आणि विविधता यासाठी ओळखले जाते. शिक्षणाची वेगळी ओळख या राज्यातून झाल्यास इतरांसाठी आदर्श ठरेल, असे त्यांनी सांगितले. राजेंद्र आर्लेकर म्हणाले, राज्याचे शैक्षणिक धोरण आणि पद्धती पाहता येणाऱ्या पिढीला दर्जेदार आणि सर्वंकष शिक्षण देण्याची गरज आहे. सामाजिक मानसिकता पाहता दर्जेदार शिक्षण म्हणजे केवळ इंग्रजी भाषेवर भर देणे उचित ठरणार नाही. भाषेबरोबरच, कौशल्यपूर्ण अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास यावरही भर देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समप्रमाणात शिक्षण मिळेल याची व्यवस्था करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात सुरुवातीला ज्ञानविकास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धनगर लोकनृत्य आणि समई नृत्य सादर केले. सायंकाळी ‘आनंदोत्सव २0१५’ हा कार्यक्रम गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली झाला. दरम्यान, दि. २७ रोजी गोवा विद्यापीठाच्या सभागृहात शैक्षणिक विषयावर विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यात सकाळी ९.३0 वाजता ‘बजेट स्कूल आणि चॅलेंज’ या विषयावर शशीकुमार बी. मार्गदर्शन करतील. ‘शिक्षणात पालकांची भूमिका’ या विषयावर मुरली कोठेश्वर हे व्याख्यान देणार आहेत. ‘द ग्राउंड रिअलिटी’ विषयावर डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे संवाद साधतील. ‘मेंटल हेल्थ इन स्कूल’ या विषयावर डॉ. हरीश शेट्टी प्रकाश टाकतील. तर ‘होलिस्टीक आणि स्कील बेस एज्युकेशन’ या विषयावर तेरेजा अल्मेदा व्याख्यान देणार आहेत. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यक्रम होईल. (प्रतिनिधी)