शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

झुआरीनगर अपघातात कारचालक जागीच ठार

By admin | Updated: March 6, 2015 01:19 IST

वास्को : झुआरीनगर येथे चौपदरी महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चारचाकीचालक जागीच ठार झाला, तर त्या वाहनातील युवती व इतर चार युवक गंभीर जखमी झाले.

वास्को : झुआरीनगर येथे चौपदरी महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चारचाकीचालक जागीच ठार झाला, तर त्या वाहनातील युवती व इतर चार युवक गंभीर जखमी झाले. जखमींपैकी तिघाजणांना बांबोळीच्या गोमेकॉत दाखल केले आहे. दोन युवकांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर दोघा जखमींना वास्कोतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी युवकांकडून जबाब घेणे शक्य न झाल्याने हा अपघात घडण्याचे कारण वेर्णा पोलिसांना समजू शकले नाही. गुरुवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने झुआरीनगर येथे बिट्स पिलानी आणि झुआरी इंडियन आॅईल टँकिंग कंपनी यांच्या मध्ये असलेल्या स्थळावर अपघात घडल्याचे कळविले. वेर्णा पोलिसांना घटनास्थळी झेन एस्टिलो (क्र. जीए ०३/एच १६५४) या गाडीचा चक्काचूर झालेला आढळला. तसेच त्या मोटारीत एका युवतीसह सहा युवक जखमी अवस्थेत सापडले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, पाच युवक वास्कोतील, तर मोटारीत असलेली युवती ही कळंगुट येथील असल्याचे सांगण्यात आले. वाहनचालक अ‍ॅलिस्टन सुकूर डिमेलो (२२, रा. पिशे डोंगरी-वास्को) असून तो जागीच ठार झाला होता. या अपघातात अ‍ॅन्थोनी रिबेलो (रा. पिशे डोंगरी), रोहन गौड (रा. मेस्तवाडा), जोसेफ डिसोझा (रा. पिशे डोंगरी) व पॅट्रिक डिसोझा (पिशे डोंगरी), उमा आलय (३०, रा. कळंगुट) जखमी झाले. अ‍ॅन्थोनी रिबेलो, रोहन गौड आणि उमा आलय यांना बांबोळीच्या गोमेकॉत दाखल केले असून अ‍ॅन्थोनी आणि रोहन यांची प्रकृती चिंताजनक आहे. जोसेफ डिसोझा आणि पॅट्रिक डिसोझा यांना वास्कोतील एसएमआरसी हॉस्पिटलात दाखल केले आहे. वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला. वेर्णा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डी. के. भट, निरीक्षक शैलेश नार्वेकर तपास करत आहेत. (प्रतिनिधी)