पेडणे तालुक्यात जोरदार वार्यांमुळे घरांवर व रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून वाहतुकीची कोंडी झाली. मात्र लगेच पेडणे अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अडथळे दूर केले. पणजी व म्हापसा अग्नीशमन दलाचे जवान अग्नी बंबासहहीत दाखल झाले होते. हणखणे तेंबवाडा येथील लवू शेटकर यांच्या राहत्या घरावर फणसाचे झाड पडल्याने ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.नागझर, हणखणे व पालये पेडणे येथे नारळाची झाडे व झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने थोड्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. मात्र पेडणे अग्नीशमन दलाच्या जवानांनी धावपळ करून रस्ते मोकळे केले.
पेडणेत पडझड
By admin | Updated: May 8, 2014 01:30 IST