शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

लोंढा-वास्को रेल्वेमार्गही दुपदरी

By admin | Updated: December 7, 2015 01:38 IST

पणजी : लोंढा-वास्को रेल्वेमार्गाचेही दुपदरीकरण केले जाईल. त्यासाठीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. या कामास लवकरच प्रारंभ

पणजी : लोंढा-वास्को रेल्वेमार्गाचेही दुपदरीकरण केले जाईल. त्यासाठीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. या कामास लवकरच प्रारंभ होईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी येथे जाहीर केले. मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस डबल डेकर जलदगती रेलसेवेचा रविवारी प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री प्रभू, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, आमदार विष्णू वाघ यांनी हिरवा बावटा दाखवून रेल्वे गाडीचा प्रारंभ केला. कला अकादमी संकुलात हा सोहळा सायंकाळी पार पडला. रिमोटच्या साहाय्याने रेलसेवेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले, की गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गोव्यासाठी जे जे मागितले ते सर्व आम्ही दिले. यापुढेही खास पर्यटन मोसमावेळी विशेष रेल्वे गाड्या सोडता येतील. त्याविषयीची गरज पडताळून पाहिली जाईल. गोवा ते तिरुपती अशी रेल्वेसेवाही लवकरच प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल. रविवारी सुरू झालेली डबल डेकर ही १ हजार प्रवासी क्षमतेची आहे. प्रत्येक कोचमध्ये १२० आसने असतील. कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. लोंढा-वास्को मार्गही दुपदरी केला जाईल. ते म्हणाले, की गोवा व मुंबईचे नाते जवळचे आहे. देशातील बंदरेही रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत. त्या वेळी गोव्याचाही विचार केला जाईल. गोव्याने देशाला अत्यंत प्रतिभावान माणसे दिली. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ दिले. अशा राज्याने काहीही मागितले की, मग आम्ही नकार देऊच शकत नाही. ते म्हणाले, रेल्वे मंत्रालयाचा कारभार अत्यंत पारदर्शक झाला आहे. हजारो कोटींच्या निविदा पारदर्शक पद्धतीने जारी केल्या गेल्या. यापुढेही आॅनलाईन पद्धतीने सर्व कामांच्या निविदा जारी केल्या जातील. तसेच रेल्वेमध्ये नोकर भरतीही आॅनलाईन केली जाईल. देशातील सर्व राज्यांशी रेल्वे मंत्रालय करार करून संयुक्त कंपनी स्थापन करील. त्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प हाती घेतले जातील. जपानमध्ये जशी रेल्वे प्रवास सुरक्षा आहे, तशीच भारतातही अमलात आणली जाईल. केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांचेही भाषण झाले. रेल्वे मंत्रालय कसे कार्यक्षम पद्धतीने चालते हे सुरेश प्रभू यांच्यामुळे कळून येते, असे नाईक म्हणाले. वरिष्ठ अधिकारी संजय गुप्ता यांनी स्वागत केले, तर राजेंद्र प्रसाद यांनी आभार मानले. (खास प्रतिनिधी)