शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बायणा किनाऱ्याच्या विकासाचा निर्धार

By admin | Updated: April 19, 2015 01:02 IST

वास्को : कित्येक वर्षे वास्को शहर विकासापासून दूर राहिले आहे़ वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ कोटी रुपये

वास्को : कित्येक वर्षे वास्को शहर विकासापासून दूर राहिले आहे़ वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास करणारा प्रकल्प आलेला आहे. त्यास मोजक्याच लोकांकडून अनेक कारणे पुढे करून विरोध होत आहे़ विरोधकांच्या या प्रयत्नांना समर्थपणे लढा देऊन त्यांचा बीमोड करण्याचा निर्धार शनिवारी (दि.१८) वास्कोवासियांनी केला़ संध्याकाळी बायणा रवींद्र भवन जवळ वास्कोतील काही नागरिकांनी बायणा समुद्रकिनारा सुशोभीकरण प्रकल्पास पाठिंब्यासाठी येथील समाज कार्यकर्ते जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते़ त्या वेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर या सभेतील अनेक वक्त्यांनी प्रकल्पास पाठिंबा दिला. तसेच वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून या प्रकल्पाविरुध्द लढा देणाऱ्यांना समर्थपणे तोंड देण्याचा निर्धार केला़ वास्को शहर हे जरी विमानतळ, मुरगाव बंदर व रेल्वेमुळे प्रसिध्द असले तरी विकासाच्या दृष्टीने मागासलेले आहे़ शहरात जरी विमानतळ आणि रेल्वे टर्मिनल असला तरी या मार्गाने येणारे प्रवासी पर्यटनाच्या नावाने या शहराची प्रसिध्दी नसल्याने थेट राजधानी किंवा इतर ठिकाणच्या पर्यटनस्थळी जातात़ शिवाय हे शहर एका टोकाला असल्याने या शहरातील सर्व व्यवहार या शहरापुरते मर्यादित असतात़ तसेच या शहरात पर्यटनस्थळांचा अभाव असल्यामुळे या शहरात पर्यटकही फि रकत नाही़ या सर्व कारणांमुळे हे शहर विकासापासून अलिप्त राहिलेले आहे़ या शहरात नयनरम्य असा समुद्रकिनारा असूनही या किनाऱ्याची पर्यटकांना ओळखही नाही़ निदान या समुद्रकिनाऱ्याचा विकास करून या शहराचे नाव पर्यटनस्थळावर आणण्यासाठी वीजमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सुमारे ९ कोटी रुपये खर्चून सुमारे ५ किलोमीटरची किनारपट्टी असलेल्या समुद्रकिनाऱ्याचा विकास करणारा हा प्रकल्प हाती घेतला आहे़ या समुद्रकिनाऱ्यावर अगदी वाळूत आणि समुद्र भरती रेषेच्या आत काही परप्रांतीयांनी बेकायदेशीरपणे आपल्या झोपड्यावजा घरे उभारलेली आहेत़ या बेकायदेशीर घरांना आरोग्याच्या दृष्टीनेही कोणत्याच सुविधा नसल्याने नैसर्गिक विधी या किनाऱ्यावरच करून किनारा दुर्गंधीमय करण्यात येतो़ अशा परिस्थितीत या किनाऱ्याचा विकास होऊच शकत नसल्याने ही बेकायदेशीर घरे हटविणे अत्यंत गरजेचे आहे़; पण या घरमालकांकडून किनारा सुशोभीकरणास विरोध होत आहे़ बेकायदेशीर झोपडपट्टीवासियांकडून होणाऱ्या विरोधामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे़ त्यांचा हा विरोध मोडून काढण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. संतोष खोर्जुवेकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनीच आभार मानले़ (प्रतिनिधी)