शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर २0१६ मध्ये निवडणूक?

By admin | Updated: December 8, 2015 01:15 IST

गोवा विधानसभेचा कार्यकाळ १८ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार असला तरी, पाच वर्षांपूर्वीप्रमाणेच या वेळीही निवडणूक

सद्गुरू पाटील ल्ल पणजी गोवा विधानसभेचा कार्यकाळ १८ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार असला तरी, पाच वर्षांपूर्वीप्रमाणेच या वेळीही निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका तीन महिने अगोदरच घेण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू आहे. डिसेंबर २०१६ किंवा जानेवारी २०१७च्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. कोणत्याही विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर निवडणुका घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असतो. मात्र, सहाऐवजी तीन महिने अगोदर आयोग निवडणुका घेतो. गोव्यात २०१२ साली तसेच घडले. ३ मार्च २०१२ रोजी गोवा विधानसभेची निवडणूक झाली होती. प्रत्यक्षात विधानसभेचा कार्यकाळ त्या वेळी मे २०१२ मध्ये संपत होता. विधानसभेची पहिली बैठक ज्या दिवशी झाली, त्या दिवसापासून कार्यकाळ मोजला जातो. गोवा विधानसभेचे पहिले अधिवेशन १९ मार्च २०१२ रोजी सुरू झाले होते. त्यामुळे १८ मार्च २०१७ रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येतो. तथापि, तीन महिने अगोदरच गोवा विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती मिळू लागली आहे. गोव्याबरोबरच अन्य काही राज्यांच्याही विधानसभा निवडणुका प्रलंबित आहेत. गोव्याची मतदारसंख्या सध्या १० लाख ७५ हजार झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात सरासरी २८ ते ३२ हजार मतदार आहेत. निवडणुका कधीही होऊ शकतात अशी कल्पना आल्यामुळे मतदार याद्या तयार ठेवण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आल्तिनो येथील कार्यालयाने सुरू ठेवली आहे. विधानसभा निवडणुकांवेळी मतदार याद्यांतून आक्षेपार्ह नावे गाळता येणार नाहीत. ती नावे आताच रद्द करण्याचे कामही सुरू आहे. सुमारे २५ हजार नव्या मतदारांची भर पडली आहे. विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये किंवा मार्चमध्येही होणार नाहीत. त्या डिसेंबर २०१६ किंवा जानेवारी २०१७च्या पहिल्या आठवड्यात होतील, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी ‘लोकमत’ला सांगितले.