शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजना आज अधिसूचित

By admin | Updated: September 1, 2014 02:07 IST

पणजी : खाण अवलंबित ट्रक, मशिन, तसेच बार्जमालकांसाठी कर्जमुक्तीची योजना सोमवारी (दि. १) अधिसूचित केली जाणार आहे.

पणजी : खाण अवलंबित ट्रक, मशिन, तसेच बार्जमालकांसाठी कर्जमुक्तीची योजना सोमवारी (दि. १) अधिसूचित केली जाणार आहे. बार्जमालकांकरिता कर्जाच्या मुद्दल रकमेत ३५ टक्के भार सरकार उचलणार आहे. सरकारला जास्तीत जास्त ४00 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. ट्रकमालकांना किमान १५ लाख व मशिन, तसेच बार्जमालकांना २५ लाख रुपयांपर्यंत फायदा होईल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजभवनवर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. बँकांकडूनही या कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे. एकरकमी कर्जफेडीसाठी ही योजना अधिसूचित झाल्यानंतर संबंधित बँकांकडून प्रस्ताव मागविले जातील आणि त्यानुसार कर्जमाफी दिली जाईल. ३0 ते ३५ टक्के भार सरकारने उचलल्यास आणि बँकांनीही तेवढीच सवलत दिल्यास केवळ ३0 टक्के स्वत:ची रक्कम भरून ट्रकमालकांना कर्जमुक्त होता येईल. बार्जमालकांच्या डोक्यावर एकूण सुमारे २८0 कोटींचे कर्ज आहे. त्यात सुमारे १६0 कोटी राष्ट्रीयीकृत बँकांचे, ९२ कोटी सहकारी बँकांचे, २0 कोटी वित्तीय कंपन्या व खासगी बँकांचे तर ८ कोटी ईडीसीचे कर्ज आहे. या कर्जावरील व्याजाची रक्कमच ७६ कोटींवर पोहोचली आहे. ट्रकमालकांचे विविध बँकांमध्ये १३0 कोटींचे कर्ज आहे. ही योजना वास्तविक २१ आॅगस्टपर्यंत येणार होती. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु ती लांबली. दरम्यान, ट्रकांवरील चालक, तसेच इतर कामगारांसाठीही लवकरच योजना येणार आहे. ती २६ आॅगस्टपर्यंत येणार असे जाहीर केले होते; परंतु ते प्रत्यक्षात आले नाही. खाण अवलंबित हॉटेल, गाडे, गॅरेजमालक यांच्याकरिता १५ आॅक्टोबरपर्यंत एकरकमी अर्थसाहायाची योजना येणार आहे. (प्रतिनिधी)