शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

खाण अवलंबितांना कर्जमुक्ती

By admin | Updated: September 6, 2014 01:25 IST

पणजी : राज्यातील ज्या खाण अवलंबितांनी ट्रक, टिप्पर, मशिनरी व बार्ज खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबर २०१२ पूर्वी कर्ज घेतले आहे, त्यांच्यासाठी सरकारने

पणजी : राज्यातील ज्या खाण अवलंबितांनी ट्रक, टिप्पर, मशिनरी व बार्ज खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबर २०१२ पूर्वी कर्ज घेतले आहे, त्यांच्यासाठी सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. त्याबाबतची अधिसूचना गुरुवारी खाण खात्याकडून जारी करण्यात आली. सविस्तर अधिसूचना गोवा प्रिंटिंग प्रेसच्या संकेतस्थळावर ३ सप्टेंबरच्या तारखेने उपलब्ध करण्यात आली आहे. सहा महिने ही योजना अस्तित्वात असेल. एका कुटुंबातील एका व्यक्तीला प्रत्येकी तीन ट्रक किंवा तीन टिप्पर किंवा तीन मशिनरिज किंवा तीन बार्जवरील कर्जासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. कर्जधारक व्यक्तीने बँका किंवा अन्य वित्तीय संस्थांकडे एकरकमी कर्जफेड योजनेसाठी अर्ज करावा, त्यानंतर ते कर्ज फेडण्यास सरकार कमाल ३५ टक्के अनुदान देणार आहे. ट्रक व टिप्परवरील कर्ज फेडण्यासाठी १५ लाख रुपये, मशिनरीसाठी २० लाख, बार्जसाठी ३५ लाख किंवा ३५ टक्के अशा प्रमाणात हे अनुदान दिले जाणार आहे, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. बँकांकडे सादर करण्यासाठी अर्जाचा नमुनाही अधिसूचनेसोबत खाण खात्याने दिला आहे. कायमस्वरूपी ठेवींवर जे कर्ज देण्यात आले आहे, त्या कर्जासाठी मात्र ही योजना लागू होणार नाही. कर्जावरील ३० जून २०१२ पूर्वीचे व्याज हे कर्जधारकासच भरावे लागेल. या योजनेसाठी सरकारने अगोदर दीडशे कोटी रुपयांची व मग अडीचशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये राज्याच्या खाण उद्योगावर बंदी आली. त्यानंतर अजूनही खाण व्यवसाय नव्याने सुरू झालेला नाही. बंदीच्या काळात कर्जधारक कर्ज फेडू शकले नाहीत. त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यावर बरेच कर्ज जमा झालेले आहे. अशा घटकांना दिलासा देण्यासाठी ही अनुदान योजना असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. (खास प्रतिनिधी)