शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

माड विधेयक मंजुरीवर टीका

By admin | Updated: March 13, 2016 01:58 IST

पणजी : माडासंबंधी गोवा सरकारने गेल्या जानेवारीमध्ये विधानसभेत संमत केलेले विधेयक राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मंजूर करणे हे

पणजी : माडासंबंधी गोवा सरकारने गेल्या जानेवारीमध्ये विधानसभेत संमत केलेले विधेयक राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मंजूर करणे हे धक्कादायक आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया समाजाच्या विविध घटकांमधून व्यक्त होत आहे. ‘निसर्ग’ संस्थेचे प्रमुख संदीप आझरेकर यांनी माड विधेयकास राज्यपालांनी दिलेल्या मंजुरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘निसर्ग’ संस्थेच्या वतीने आम्ही दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांची भेट घेऊन त्यांना या विधेयकामागची आमची भूमिका पटवून दिली होती. राज्यपालांना हा प्रश्न समजला होता; तरी त्यांनी मंजुरी देण्यास घाई का केली, ते आम्हाला समजले नाही, असे आझरेकर म्हणाले. ‘झाडाचा बांधा कमी करून झाडाची व्याख्या बदलण्यावर आमचा आक्षेप आहे. त्यामुळे खासगी जंगलातील बऱ्याच छोट्या बांध्याच्या झाडांवर संक्रांत येणार आहे. ही जंगले कापून तेथे काँक्रिटची जंगले उभारण्यास त्यामुळे वेग येईल,’ अशी प्रतिक्रिया आझरेकर यांनी दिली. माडाची व्याख्या बदलण्याची गरज सरकारला ३२ वर्षांनंतर का भासली याचे स्पष्ट आणि पटण्याजोगे कारण गोव्याच्या जनतेला द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. १९८४ सालच्या मूळ कायद्यातील कलमानुसार, ज्या रोपाचा बुंधा ५ सेंटीमीटरहून अधिक व्यासाचा आहे आणि ज्याची उंची ३० सेंमी.हून अधिक आहे ते ‘झाड’ या व्याख्येत बसते. आता दुरुस्तीद्वारे व्यासाची मर्यादा वाढवून १० सेंटीमीटर केली असून उंचीची मर्यादाही वाढवून १ मीटर केलेली आहे. कोणत्याही रोपाची वाढ होताना त्याची उंची वाढते व व्यास कमी होतो हे लक्षात घेतल्यास लहान अवस्थेतील असंख्य झाडांच्या कत्तलीची मुभा नव्या दुरुस्तीमुळे मिळाल्याचे स्पष्ट होते, असा दावा सरदेसाई यांनी केला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय कमी व्यासाची रोपे आता बेलाशक छाटता येतील आणि त्यामुळे राज्यातील ५० टक्के निसर्गसंपदेवर संक्रांत येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवीत असल्याच्या वृत्ताकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. स्वच्छ भारत अभियान राज्यात राबविणाऱ्या राज्यपाल राज्यातील वनसंपदेच्या सफाईला तर हातभार लावत नाहीत ना, असा सवालही सरदेसाई यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा म्हणाले की, राज्यपालांनी या विषयाचा अभ्यास करायला हवा होता. माडासंबंधीचे दुरुस्ती विधेयक सरकारने आणल्यानंतर (पान २ वर)