शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

गुन्हे, दरोड्यांचे वर्ष

By admin | Updated: January 9, 2015 02:15 IST

तपासातही प्रगती : गंभीर अपघात वाढले; नशेबाज चालकांच्या प्रमाणात वाढ

पणजी : मावळते वर्ष हे गुन्हेगारीचे आणि अपघाती मृत्यूचे ठरल्याचे पोलीस खात्याच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. गुन्ह्यांचे प्रमाण मावळत्या वर्षी ३.५ टक्के वाढले. या पार्वभूमीवर पोलिसांची ५.६७ टक्के तपास क्षमता ही दिलासादायक आहे. पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळत्या वर्षी ४४६६ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१३ वर्षी ती ४३१२ एवढी होती. गुन्हेगारी वाढली असली, तरी तपासाचे प्रमाणही वाढल्यामुळे उपमहानिरीक्षकांनी समाधान व्यक्त केले. गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात अल्प अशी १.८ टक्के घट झाली. अतिगंभीर तक्रारीच्या तपासात या वर्षी गती प्राप्त झाली नाही. उलट ०.६ टक्क्याने ती कमी झाली आहे. मावळत्या वर्षात अपघात किंचित कमी झाले आहेत; परंतु झालेले अपघात हे मोठ्या प्रमाणावर जीवघेणे अपघात ठरले आहेत. अपघातांचे प्रमाण दीड टक्क्याने कमी झाले आहे, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण १३.६ टक्क्यांनी वाढले आहे. नशेत वाहने चालविण्याची प्रकरणे जी २०१३ मध्ये केवळ ३६२ एवढी आढळली होती, ती मावळत्या वर्षी ३३३४ एवढी नोंद झाली आहेत. महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या १०९१ या हेल्पलाईनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे रंगानाथन यांनी सांगितले. मावळत्या वर्षात या क्रमांकावर संपर्क करून मदतीसाठी याचना करणारे एकूण ३०४ फोन आल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी प्रत्येक पोलीस स्थानकांत हेल्पडेस्क सुरू करण्याची घोषणाही खात्याने केली आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी १०९० हेल्पलाईन जारी करण्यात आली असून आतापर्यंत २९ कॉल्स त्यावर नोंद झाले आहेत. हायवे पेट्रोलिंगसाठी १० वाहनांची सोय, पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष हेल्पलाईन या गोष्टी मावळत्या वर्षीच्या उजव्या बाजू आहेत. पोलीस खात्याने स्वतंत्र सायबर विभाग सुरू करून अधिसूचित केल्यानंतरही या विभागात पुरेसे मनुष्यबळ पुरविण्यात आलेले नाही. शिवाय आवश्यक साधनसुविधाही अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. सायबरलॅबचा प्रस्तावही खितपत पडला आहे. असे असतानाही तुटपुंज्या साधनसुविधांनी कार्यरत असलेल्या या विभागाने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. वेबसाईट हॅकिंग प्रकरणे, ३५ लाख रुपयांचा बँकेला गंडा घालण्याचे प्रकरण, फेक प्रोफाईल करून बदनामी करण्याची प्रकरणे यांसह अनेक प्रकरणे या विभागाने यशस्वीपणे धसास लावली आहेत. (प्रतिनिधी)