शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटू उपाशी; जीसीएचे सदस्य तुपाशी

By admin | Updated: July 20, 2014 01:40 IST

णजी : इंग्लंडसह युरोपच्या दौऱ्यावर जाणाऱ्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सहा सदस्यांचा प्रश्न गाजत असतानाच सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने

णजी : इंग्लंडसह युरोपच्या दौऱ्यावर जाणाऱ्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सहा सदस्यांचा प्रश्न गाजत असतानाच सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने आॅस्ट्रेलियासह अनेक विदेश दौरे व एकूण प्रवासावर एका वर्षात अडीच ते तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. आपली सुखे वाढविण्याच्या नादात या मंडळाचे क्रिकेट व स्थानिक खेळाडूंच्या विकासाकडे संपूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या सदस्यांच्या पथकाने २६ लाख रुपयांचा खर्च केला आहे; परंतु गोव्यातील क्रिकेटच्या सुधारणेच्या नावाखाली केलेल्या या दौऱ्याचा अहवाल नियमाप्रमाणे निबंधकांच्या कार्यालयाला सादर करण्यात आलेला नाही. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या संकुलात वैद्यकीय दालन तयार करण्यात आले असून त्यावर एक लाख ३१ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. कोणताही खर्च २५ हजारांपेक्षा अधिक झाला तर त्याला स्थायी समितीकडून मान्यता मिळवावी लागते. तशी आगाऊ मान्यता वैद्यकीय दालनासाठी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे डॉ. शेखर साळकर व संघटनेचे सरचिटणीस चेतन देसाई यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्या परिणामातून या दालनाचे केवळ दरवाजे काढून टाकण्यात आले; परंतु पुढे कारवाई मात्र झाली नाही. सांगे येथे उभारण्यात येत असलेले क्रिकेट स्टेडियमही सध्या खर्चावरून वादात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. या मैदानात अजून खूप कामे व्हायची असली तरी जीसीएने त्यावर एक कोटी रुपये खर्च केला आहे. (पान २ वर)