शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

By admin | Updated: September 18, 2016 04:35 IST

भारतीय जनता पार्टीचेच युती सरकार २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अधिकारावर येईल.

पणजी : भारतीय जनता पार्टीचेच युती सरकार २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अधिकारावर येईल. मातृभाषेचे आम्ही खुनी नव्हे. कावळ््याच्या शापाने गाय मरत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंच व सुभाष वेलिंगकर यांचे नाव न घेता निशाणा साधला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही, आपण सहा महिने कळ सोसली; पण निवडणुकीवेळी योग्य ते उत्तर देईन, असा इशारा वेलिंगकर यांना दिला.भाजपाच्या सुमारे सहाशे कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात पार पडली. पर्रीकर, पार्सेकर यांच्यासह भाजपाचे सगळे मंत्री, आमदार व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाषा सुरक्षा मंचला कानपिचक्या देण्याचा प्रयत्न केला. पर्रीकर खोटारडे व विश्वासघातकी तर पार्सेकर चांगले, असे विधान काहीजण (वेलिंगकर यांचे नाव घेतले नाही) करून आपल्यात व पर्रीकर यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत जावे व या अपप्रचारास जोरदार उत्तर द्यावे, असे आवाहन पार्सेकर यांनी केले. आता आम्ही बोलणारच. आता आमच्या टीकाकाराकडे कवचकुंडले (वेलिंगकरांकडे संघचालकपद) राहिलेली नाहीत. मातृभाषेतूनच मुलांचे प्राथमिक शिक्षण व्हायला हवे, हे आम्हीही मान्य केले आहे. ९३ मराठी-कोकणी शाळांना आम्ही परवानगी दिली, असे पार्सेकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)