शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

तेरेखोल येथे गोल्फ कोर्सचे काम चालूच

By admin | Updated: May 19, 2015 01:29 IST

पेडणे : केरी पंचायत क्षेत्रातील तेरेखोल गावातील दिल्ली येथील मेसर्स लिडिंग हॉटेल प्रा. लि. मिरेड कंपनीने जागा घेऊन गोल्फ कोर्स प्रकल्पाचे

पेडणे : केरी पंचायत क्षेत्रातील तेरेखोल गावातील दिल्ली येथील मेसर्स लिडिंग हॉटेल प्रा. लि. मिरेड कंपनीने जागा घेऊन गोल्फ कोर्स प्रकल्पाचे काम प्राथमिक पातळीवर सुरू केले आहे. प्रकल्पाच्या कामाला अडथळा करत ग्रामस्थ व अ‍ॅड. अ‍ॅन्थनी कूळ-मुंडकार संघटनेने पेडणे पोलिसात बेकायदा रस्ता व झाडे कापल्याची तक्रार दिली. मात्र, कोणतीही तक्रार अथवा गुन्हा पेडणे पोलिसांनी नोंदवला नाही. लिडिंग हॉटेल कंपनीने संपूर्ण तेरेखोल गावातील साडेबारा लाख चौरस मीटर जागा मूळ मालक (खलप) यांच्याकडून विकत घेतलेली आहे. काही जमिनीत कूळ-मुंडकार नोंदणी आहेत. कुळाच्या जमिनी सहजासहजी विकत घेता येत नाहीत. मात्र, काही कुळांनी यापूर्वी मामलेदार कार्यालयात न्यायालयात अर्ज करून आपली १/१४ उताऱ्यावर चुकून कुळाची नावे लागली, त्यामुळे आपले कूळ नाव रद्द करावे, यासाठी अर्ज केले, त्यामागे वेगळी कारणे आहेत. लिडिंग हॉटेल कंपनीने १५ मे रोजी गोल्फ कोर्स प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यासाठी पूर्वी केलेला रस्ता खोदण्याचे काम झाडेझुडपे व अडथळे दूर करून मोठी जेसीपी यंत्रणा प्रकल्पस्थळी आणली जात होती. त्याचा सुगावा ग्रामस्थ व काही कूळ मालकांना लागला. ज्यांचा या प्रकल्पाला नव्हे, तर कुळाच्या जमिनी द्यायला विरोध आहे त्यांनी एकत्रित येऊन कामात अडथळा निर्माण केला. त्यानुसार तेरेखोल कूळ-मुंडकार संघटना व काही ग्रामस्थांनी बेकायदा रस्ता व झाडे कापल्याची तक्रार पेडणे पोलीस स्टेशन, वन खाते, पेडणे मामलेदार यांना दिली होती. यासंदर्भात पेडणे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्याकडे संपर्क साधला असता अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा नोंद केलेला नाही किंवा तक्रार नोंदवलेली नाही. तक्रारीसंबंधी तपास व प्राथमिक चौकशी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीबरोबर चर्चा चालू ज्यांच्या कुळाच्या जमिनी कंपनीने घेतलेल्या आहेत, त्या कुळाच्या संबंधित व हॉटेल लिडिंग कंपनीचे यास जबाबदार अधिकारी माहोतो यांच्याकडे चर्चा कुळांनी सुरू केली असून काही कूळ मालकांनी आपल्या मागण्या कंपनीकडे लेखी स्वरूपात सादर केलेल्या आहेत. त्यात एकूण २ लाख ९० हजार चौरस मीटर कुळाची जागा कंपनीने परत करावी, ही जमीन १२ कुटुंबांची आहे, असे म्हटले आहे. कुळांना हक्क मिळावा यासाठी धडपडणारे युवा वकील अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर यांच्याकडे संपर्क साधला असता कंपनीला कुळांच्या मागण्या लेखी स्वरूपात सादर केलेल्या आहेत. त्या मागण्या मान्य होतील, असा विश्वास व्यक्त होऊन दोन वेळा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा यशस्वी झाली असून पुढील अंतिम चर्चेत यावर तोडगा निघेल. कंपनीने जे बेकायदा काम चालू केले त्याविषयी लेखी तक्रारी दिल्याचे अ‍ॅड. शहापूरकर म्हणाले. (प्रतिनिधी)