शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रिक्स’ पर्यावरण परिषदेत वायू, जल प्रदूषणावर चिंता

By admin | Updated: September 17, 2016 02:17 IST

मडगाव : जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्राझिल, रशिया, भारत, चीन

मडगाव : जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका हे पाच ‘ब्रिक्स’ देश एकत्र आले असून या देशांतील नद्यांचे शुद्धीकरण हे या परिषदेचे प्रमुख लक्ष्य बनले आहे. ‘ब्रिक्स’ची पर्यावरण परिषद कासावली येथे पार पडली. या दोन दिवसांच्या परिषदेत पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाबरोबरच हवामान बदलामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर गंभीरतेने चर्चा करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्री अनिल दवे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पाचही देशांचे पर्यावरणमंत्री व इतर महत्त्वाचे पदाधिकारी सध्या गोव्यात जमले असून शुक्रवारी या दोन दिवसांच्या परिषदेचा समारोप झाला. पर्यावरणीय समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी या पाचही देशांत समझोता करार झाला असून पाचही देश एकमेकांच्या साहाय्याने या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील, असे दवे यांनी सांगितले. पाणी व हवेतील प्रदूषण, जागतिक हवामान बदल, सक्षम कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संवर्धन या चार मुद्द्यांवर या परिषदेत गंभीरतेने चर्चा झाली. या समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पाचही देश तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणार असून यासंबंधी येत्या एप्रिल महिन्यात चीनमध्ये तंत्रज्ञांची एक बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात या पाचही देशांचे मंत्री मोरोक्को येथे पुन्हा जमणार असल्याची माहिती त्यांनी दिली.