शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा कर्मचाऱ्यांची कांपाल येथे निदर्शने

By admin | Updated: March 11, 2015 03:15 IST

पणजी : क्रीडा खात्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या १४१ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकल्याने कामगारांनी कांपाल येथे क्रीडा खात्यासमोर

पणजी : क्रीडा खात्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या १४१ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकल्याने कामगारांनी कांपाल येथे क्रीडा खात्यासमोर निदर्शने दिली. सेवेतून काढून टाकताना दोन महिन्यांनी पुन्हा सेवेत घेतले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही सेवेत घेण्याबाबत तयारी दाखवत नसल्याने सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. कंत्राटी पद्धती राबवून सरकार कामगारांवर पूर्णपणे अन्याय करत आहे. १ आॅक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले होते; पण दोन महिन्यांनी म्हणजे डिसेंबरमध्ये पुन्हा घेतले जाईल, असे आश्वासन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी दिले होते. मात्र, आता सहा महिने उलटून गेले तरी नोकरीवर पुन्हा घेण्याबाबत काहीच आश्वासक शब्द देण्यात येत नसल्याने कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने विविध सरकारी खाती, तसेच मंडळांद्वारे कर्मचाऱ्यांना कंत्राटी सेवेवर घेतले. रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बढाया मारणाऱ्या सरकारने कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या आणि सेवेतून मुक्त केलेल्या कामगारांनाच आधी कामावर कायम करून घ्यावे, असे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले. क्रीडा खात्यातून कंत्राटी तत्त्वावर भरती केलेल्या १४५ कामगारांना आॅक्टोबर २0१४ पासून कामावरून कमी करण्यात आले आहे. कामावरून कमी करताना दोन महिन्यांत पुन्हा भरती करून घेण्यात येईल, असे आश्वासन क्रीडा संचालकांनी कामगारांना दिले होते. मात्र, आता पाच महिने होत आले असले तरी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास पुढाकार घेतला जात नाही, असे राणे यांनी सांगितले. सरकारच्या कंत्राटी पद्धतीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सर्व कंपनीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक इत्यादी कामगार एकत्र येऊन विधानसभेवर मोर्चा नेणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. १२ मार्च रोजी कर्मचाऱ्यांकडून एक दिवसीय लाक्षणिक धरणे क्रीडा खात्याच्या समोर केले जाईल. या नंतरही कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत सरकारने प्रतिसाद दिला नाही तर १४ मार्च रोजी शहरात रॅली काढण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)