शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चर्चिल, रवी, सार्दिन काँग्रेसमध्ये नकोच!

By admin | Updated: July 2, 2015 01:31 IST

पणजी : चर्चिल आलेमाव यांना काँग्रेस पक्षात फेरप्रवेश दिला जाऊ नये, अशी जोरदार मागणी बहुतेक काँग्रेस आमदारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत केली.

पणजी : चर्चिल आलेमाव यांना काँग्रेस पक्षात फेरप्रवेश दिला जाऊ नये, अशी जोरदार मागणी बहुतेक काँग्रेस आमदारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत केली. माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन आणि रवी नाईक यांना २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने उमेदवारी देऊ नये, अन्यथा काँग्रेसवर परिणाम होईल आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असे बहुतेक आमदारांनी बैठकीत स्पष्ट केले.दिगंबर कामत, पांडुरंग मडकईकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विश्वजित राणे हे आमदार बैठकीत सहभागी झाले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे अध्यक्षस्थानी होते. राणे यांच्या आल्तिनो येथीलच खासगी निवासस्थानी झालेल्या या बैठकीवेळी राणे हे चर्चिल किंवा रवी नाईक किंवा सार्दिनविरुद्ध काही बोलले नाहीत. चर्चिलला फेरप्रवेश देण्याचा विषय पक्षासमोर आहे असे आपल्याला वाटत नाही, असे राणे यांनी आमदारांना सांगून शांत केले. रेजिनाल्ड वगैरे काही आमदार चर्चिल, रवी, सार्दिनच्या विषयावर आक्रमक बनले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो हे चर्चिलला पक्षात पुन्हा आणू पाहत आहेत. २०१२ च्या निवडणुकीवेळी आम्हाला चर्चिल आलेमाव हे अत्यंत महागात पडले. जे नेते वयाने जास्त झालेत व ज्यांच्याविषयी वाद आहेत अशा नेत्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर पुन्हा २०१७ सालीही जनता काँग्रेसला स्वीकारणार नाही, अशी खंत रेजिनाल्ड व अन्य काही आमदारांनी बैठकीत व्यक्त केली. रवी व सार्दिनलादेखील उमेदवारी देऊ नये. स्वत: फालेरो यांनी देखील काँग्रेसच्या उमेदवारीवर उभे राहणे हे काँग्रेससाठी मारक ठरेल, असे मत काहीजणांनी व्यक्त केले. विधानसभा अधिवेशनावेळी महागाई, वीज दरवाढ अशा विषयांवर सरकारला उघडे पाडावे, असे ठरले. (खास प्रतिनिधी)