पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन गोव्यात एआयएस अधिकाऱ्यांचे स्वतंत्र केडर असावे, या मागणीचा पाठपुरावा केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही मुख्यमंत्री भेटले व त्यांनी जुवारी पुलासह राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविषयी चर्चा केली. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर यांना भेटून त्यांनी कालबाह्य कायद्यांमध्ये सुधारणा करण्याविषयी चर्चा केली. (प्रतिनिधी)
स्वतंत्र केडरसाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा
By admin | Updated: July 5, 2014 00:47 IST