शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानदान पद्धतीत बदल आवश्यक

By admin | Updated: May 1, 2016 02:38 IST

पणजी : आज आपल्या देशात चाळीस हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. तरीही आपण सर्व स्तरांमधील मुलांपर्यंत पोहोचण्यास

पणजी : आज आपल्या देशात चाळीस हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. तरीही आपण सर्व स्तरांमधील मुलांपर्यंत पोहोचण्यास कमी पडतोय. आजच्या पारंपरिक ज्ञानदानाच्या पद्धतीत कालानुरूप बदल होणे आवश्यक आहे. आजची शिक्षण पद्धती दुर्दैवाने विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करत नाहीत. सर्व प्रकारच्या भौगोलिक सीमा पार करून तंत्रज्ञानाच्या आधारे आजचे शिक्षण सर्वव्यापी होणे महत्त्वाचे आहे. आज विद्यापीठाने जागतिक ज्ञानकेंद्र बनले पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. एस. एस. धेंपो वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारोह आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. वाय. व्ही. रेड्डी, उच्च शिक्षण संचालक प्रा. भास्कर नायक, धेंपो चॅरिटी ट्रस्टच्या विश्वस्त पल्लवी धेंपो, यतीश धेंपो, प्राचार्या डॉ. राधिका नायक आणि उपप्राचार्य हमीद खानापुरी उपस्थित होते. मिरामार येथील गास्पार डायस सभागृहात हा सोहळा आयोजित केला होता. देशमुख म्हणाले, आजच्या अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने मुंबई विद्यापीठाने पाऊल उचलले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व अभ्यासक्रमांत बदल केला जाणार आहे. आपण पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून नव्या शैक्षणिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. तरच आपण अशिक्षित मुलांपर्यंत पोहोचू, असे त्यांनी नमूद केले. राज्यातील विद्यापीठांनीही आॅनलाईन पद्धत वापरून मुली व महिलांपर्यंत पोहोचावे, असे ते म्हणाले. या वेळी इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे माजी प्रशासक जी. आर. सरदेसाई आणि विद्यमान प्रशासक सुनील प्रभूदेसाई यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ‘धेंपोआईट’ या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. पल्लवी धेंपो यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षाचा आढावा घेतला. पल्लवी वागळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)