शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची मेक इन इंडिया योजना अयशस्वी

By admin | Updated: May 24, 2015 01:22 IST

मडगाव : केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटले असून सरकारची मेक इन इंडिया योजना अयशस्वी ठरली आहे. सरकारने योजना तयार

मडगाव : केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटले असून सरकारची मेक इन इंडिया योजना अयशस्वी ठरली आहे. सरकारने योजना तयार करण्यासाठी कोणतेही नियोजन केले नव्हते, अशी माहिती प्राप्त झाली असल्याचे राज्यसभा खासदार अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.या वेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आल्तिन गोम्स व दक्षिण गोवा जिल्हा काँग्र्रेसचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.शांताराम नाईक म्हणाले की, काँग्रेस पक्षाने बांगलादेश सीमेच्या विषयावर सरकारला पाठिंबा दिला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोमांस खाणाऱ्यांनी पाकमध्ये चालते व्हा, असे विधान केले होते. हे विधान देशद्रोही व संवेदनशील आहे. अर्थ राज्यमंत्री निर्मल सीताराम यांनी योजना तयार करण्यासाठी नियोजन केले नाही. डिसेंबर माहिन्यात केवळ एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी काही बुकलेट छापण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये कोणत्या खात्यामार्फत कामे केली जातील याची माहिती किंवा उल्लेख करण्यात आला नव्हता. केंद्र सरकारने मेक इन इंडिया संकल्पना वाऱ्यावर सोडली आहे. सरकारने केलेल्या प्रत्येक करामध्ये मेक इन इंडियाची संकल्पना येणे अनिवार्य होते, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)