शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनो, हॉटेल्स, बारबाहेर अल्कोमीटर

By admin | Updated: July 24, 2014 01:27 IST

पणजी : कॅसिनो, मोठी हॉटेल्स व बारमधून परतणाऱ्यांची अल्कोमीटर चाचणी घेण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

पणजी : कॅसिनो, मोठी हॉटेल्स व बारमधून परतणाऱ्यांची अल्कोमीटर चाचणी घेण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिली. दारूच्या नशेत त्यांनी वाहने चालवू नयेत, यासाठी ही खबरदारी असल्याचे त्यांनी सांगितले. दारूच्या नशेत वाहने चालवून स्वत: अपघातात सापडणे आणि दुसऱ्यांचा जीवही घेण्याचे प्रकार वाढू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल, मद्यालये किंवा कॅसिनोतून बाहेर आलेल्या लोकांची अल्कोमीटर लावून चाचणी केल्यावर सर्वच दारूच्या नशेत आढळले आणि त्यांचा वेगळा (दारू न पिलेला) चालक नसला, तर त्यांना गाडी चालवू दिली जाणार नाही किंवा त्यांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी बारमालकाला दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मद्यालयांची वेळ हल्लीच वाढविण्यात आली होती. विशेष शुल्क भरून रात्री ११ नंतर मद्यालये चालविण्यासाठी मुभा देण्यात आली होती. या निर्णयाला राज्यभर विरोध झाला होता. विशेषकरून महिला व महिला संघटनांनी विरोध केला होता. या निर्णयावर आता फेरविचार होणार असून अशा मद्यालयांवर निर्बंध आणले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मद्यालयांची वेळ वाढविण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध प्रसारमाध्यमांतूनही तीव्र टीका झाली होती. पाटो-पणजी येथील ‘डाउन द रोड’ पबजवळ झालेल्या तलवार हल्ला प्रकरणानंतर तर हा विषय अधिक ताणून धरण्यात आला होता. बुधवारी सभागृहात या विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, प्रसारमाध्यमांनी हा विषय आपल्या लक्षात आणून दिल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)