शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

धारगळ येथील युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

By admin | Updated: November 27, 2015 01:30 IST

पणजी : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्याच्या प्रकरणात धारगळ येथील गजानन पाडलोसकर (२५) याच्याविरुद्ध

पणजी : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्याच्या प्रकरणात धारगळ येथील गजानन पाडलोसकर (२५) याच्याविरुद्ध पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विवाह नोंदणीची पहिली स्वाक्षरी झाल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे मुलीने पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला. युवक हा धारगळ येथील असून पणजीतील एका हॉटेलमध्ये तो रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतो, तर पीडित युवती ही उत्तर गोव्यातीलच आहे. पीडित मुलीशी त्याचे दोन वर्षांपासून संबंध होते. दरम्यानच्या काळात तिला त्याच्यापासून दिवसही गेले होते. त्यानंतर ६ नोव्हेंबर ही लग्नाची तारीखही ठरली होती आणि त्यासाठी उपनिबंधकाच्या कार्यालयात विवाह नोंदणीसाठी दोघांची पहिली स्वाक्षरीही झाली होती; परंतु दुसऱ्या स्वाक्षरीपूर्वी संशयिताने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लग्नाला नकार दिला. या घटनेमुळे धास्तावून जाऊन त्या युवतीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. पणजी महिला पोलीस स्थानकात पाडलोस्कर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पीडित युवती पोलीस स्थानकात तक्रार नोंदविणार याची कल्पना संशायिताला होती, त्यामुळे त्याने त्यापूर्वीच अटकपूव जामिनासाठी अर्ज केला होता. म्हापसा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूरही केला. त्यामुळे पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत. गुन्हा नोंदविण्यापूर्वी त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यामुळे पीडितेच्या वतीने बाजू मांडण्यात आली नव्हती. आता हा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे महिला पोलिसांकडून सांगण्यात आले.