शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कळसाप्रश्नी पुन्हा कर्नाटकी कुरघोडी

By admin | Updated: December 7, 2015 01:40 IST

डिचोली : म्हादई पाणीवाटप जललवादाच्या सातत्यपूर्ण विरोधाला तसेच वन पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशाला हरताळ फासत

डिचोली : म्हादई पाणीवाटप जललवादाच्या सातत्यपूर्ण विरोधाला तसेच वन पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशाला हरताळ फासत कर्नाटकने पुन्हा एकदा कळसा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गोव्यावर पुन्हा एकदा पाणीसंकट उभे ठाकले आहे. जललवादासमोर गोव्याची बाजू भक्कम असल्याने कर्नाटकचे धाबे दणाणले होते. त्यानंतर गेले पाच महिने त्यांनी राजकीय नेते, धार्मिक नेते, अभिनेते, शेतकरी यांना रस्त्यावर उतरवत आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे. सतत राज्य व केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळास पाचारण करून कर्नाटकने पाण्याचा हट्ट धरला होता. मात्र, पंतप्रधानांनी त्यांना फारशी दाद न दिल्याने राजकीय नेते सैरभैर झाले असून चार महिने आंदोलन चालले आहे. २३ नोव्हेंबर रोजी असलेली जललवादासमोरील सुनावणी न्यायमूर्ती पांचाळ आजारी असल्याने २३ फेबु्रवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याच गोष्टीचा फायदा उठवत कर्नाटकने मशिनरी व इतर सामग्री एकत्र आणून कामाला सुरुवात केल्याने कर्नाटकची चाल धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. गोव्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा गोव्याला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याची भीती राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे. मे २०१४ रोजी कळसा येथे मलप्रभेत जाणारे पाणी अडवण्यासाठी बांध घालण्याचा आदेश दिल्यानंतर कर्नाटकने आठ महिने काम बंद ठेवले होते. त्यानंतर पुन्हा काम सुरू केले. गेल्या दोन सुनावणीदरम्यान बंद असलेले काम आता नव्याने सुरू करण्याचा घाट घातल्याने म्हादईच्या अस्तित्वाची लढाई तीव्र करण्याची गरज निर्माण झाली आहे. कळसा येथे उभारलेला बांध तोडण्याची धमकी उत्तर कर्नाटकातील नेत्यांनी वारंवार दिली आहे. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या बांधाला पूर्ण संरक्षण देण्याची हमी दिली होती. या ठिकाणी संरक्षण देण्यात आले होते. मात्र, आता प्रत्यक्षात नव्याने काम सुरू करण्यात आल्याने कर्नाटक नवी चाल खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेऊन केंद्रावर दबाव आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न कर्नाटकने चालवला असून गोव्यावर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच आहे. न्यायालयाच्या कक्षेबाहेर सामंजस्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या कर्नाटकाला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या प्रश्नी लवादाच्या कक्षेबाहेर प्रश्न सोडवण्यास हरकत घेतलेली असून प्रत्येक कृतीने गोव्याने कर्नाटकाला कात्रीत पकडल्याने कर्नाटकाचे धाबे दणाणले असून काम सुरू करून गोव्यावर कुरघोडी करण्याचा नवा डाव आखला आहे. (प्रतिनिधी)