शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने १६ दुचाकींना ठोकरले; युवक गंभीर

By admin | Updated: March 4, 2015 01:56 IST

पणजी : पणजी बसस्थानकाजवळ फोर्ड एन्डेवर कार चालकाचा वाहनावरील ताबा गेल्यामुळे त्याने १६ वाहनांना ठोकर दिली.

पणजी : पणजी बसस्थानकाजवळ फोर्ड एन्डेवर कार चालकाचा वाहनावरील ताबा गेल्यामुळे त्याने १६ वाहनांना ठोकर दिली. या अपघातात योगेश हेदे हा दुचाकीचालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. हा अपघात संध्याकाळी ३ वाजता येथील क्रांती सर्कलजवळ झाला. म्हापसा दिशेहून येणाऱ्या कारने क्रांती सर्कलच्या बाजूने वळण घेतल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा गेला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकींना त्याने ठोकर दिली. एक दुचाकीस्वार रस्त्यावर आपटल्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाली. त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. दुसरा दुचाकीचालक लॉयल फर्नांडिस हा किरकोळ जखमी झाला आहे. गाडीवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नातच कार बाजूला असलेल्या पार्किंग जागेत घुसली. तेथील दुचाक्यांना ठोकर देत ती पुढे गेली. थेट गाडीची टक्कर बसलेल्या आणि एकावर एक आपटून अशा एकूण १४ दुचाक्या खाली पडल्या. काही दुचाक्यांचे मोठे, तर काहींचे किरकोळ नुकसान झाले आहे. वाहनाचा वेग फार असल्यामुळेच चालक सागर वडारकर याचा त्यावरील ताबा गेला. दोन मोटरसायकलना ठोकर दिल्यावर ती डावीकडे वळविण्याच्या प्रयत्नात त्याने त्या ठिकाणी असलेल्या बॅरेकेट्सवर घातली. त्यानंतर बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेल्या मोटरसायकल तुडवीत ती पुढे गेली. या प्रकरणात चालकाला अटक करण्यात आली आहे. निष्काळजीपणे वाहन हाकलल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम २७९, ३३७ आणि ३३८ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)