शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर वाहतूक अधिकारी जाळ्यात

By admin | Updated: July 8, 2015 01:40 IST

पणजी : वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक उदय गावस आणि साहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक एम. व्ही. उम्रसकर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात

पणजी : वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक उदय गावस आणि साहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक एम. व्ही. उम्रसकर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पाटो-पणजी येथील एका हॉटेलमध्ये भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत कंत्राटदाराकडून ९० हजार रुपये लाच स्वीकारताना या दोघांना अटक करण्यात आली.फोंडा येथील आरआयएम लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे भागीदार असलेले राजीव राजन सिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे केलेल्या तक्रारीवरून ही लाचखोरी उघडकीस आली आहे. आंतरराज्य वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिंग यांच्या कंपनीकडून परवानगीसाठी अर्ज केला होता; परंतु या अर्जाचा विचार करण्यात आला नव्हता. वाहतूक खात्याच्या पणजी कार्यालयातील साहाय्यक संचालक उदय गावस यांनी त्यांची फाईल अडवून ठेवली होती. परवाना हवा असेल, तर दीड लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. तशी सूचना त्यांनी साहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक एम. व्ही. उम्रसकर यांच्यामार्फत अर्जदार सिंग यांना केली होती.सिंग यांनी वाहतूक अधिकारी आपल्याकडे लाच मागत असल्याची माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली. तशी रीतसर तक्रारही नोंदविली. त्यानंतर एसीबीकडून सापळा रचून या दोघाही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पाटो-पणजी येथील एका हॉटेलमध्ये हे डील केले जात असतानाच पोलिसांनी छापा टाकून पुराव्यासह दोघांनाही अटक केली. ९० हजार रुपये रक्कमही जप्त करण्यात आली.डील करण्यासाठी हे अधिकारी वाहतूक खात्याचीच जीप घेऊन आले होते. सिंग यांनी संकेत देताच एसीबीचे अधिकारी हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांना पकडले. पकडण्यात आल्यानंतर दोघेही संशयित आणि त्यांच्या जीपचे चालक अशा तिघांनाही संस्कृती भवनातील एका खोलीत नेण्यात आले. त्या ठिकाणी चार तास चौकशी सुरू होती. एसीबीचे उपअधीक्षक बोसुएट सिल्वा आणी नोलास्को रापोझ त्यांची चौकशी करत होते. भ्रष्टाचारविरोधी कायदा कलम ७, १३ (१) (डी) आणि १३ (२) अंतर्गत दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)