शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात भाजपा सरकारचा शपथविधी अडचणीत? कॉंग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 22:10 IST

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे मनोहर पर्रीकर उद्या पदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपाला कमी जागा मिळाल्या असून त्यांचा सरकार स्थापन करण्याचा निर्णय

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे मनोहर पर्रीकर उद्या पदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपाला कमी जागा मिळाल्या असून त्यांचा सरकार स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणत याविरोधात कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शविली आहे. याबाबत उद्या सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सुनावणी होणार आहे. 
भाजपाने मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करण्यात दावा केला आहे. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली असून गोवा विधानसभेत  बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पार्टीला बहुमत मिळाले नसून कॉंग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाला 13 जागा मिळाल्या आहेत. भाजपाने अन्य पार्टीच्या सदस्यांना सोबत घेऊन जादुई आकडा गाठण्याचा दावा केला आहे. 
भाजपाचे सरकार नियमबाह्य असल्याचा कॉंग्रेसने आरोप केला असून गोव्यात कॉंग्रेस मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी बोलविले नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी कॉंग्रेस नेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होणार असून कॉंग्रेसची बाजू अभिषेक मनू सिंघवी कोर्टात मांडणार आहेत. त्यामुळे भाजपाचा उद्याचा शपशविधी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
तसेच, कॉंग्रेस उद्या संसदेत गोवा आणि मणीपूरमध्ये सरकार स्थापनेबद्दलचा मुद्दा लावून धरणार आहे.