शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

सरकारकडून विश्वासघात

By admin | Updated: January 4, 2015 02:30 IST

एलिनांची उपस्थिती : गोवाज मूव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटसतर्फे आरोप

पणजी : गोव्याला खास दर्जाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विश्वासघात केल्याचा आरोप गोवाज मूव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटस या संघटनेतर्फे शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला. या वेळी वनमंत्री एलिना साल्ढाणाही उपस्थित होत्या. या मागणीसंदर्भातील ठराव यापूर्वी विधानसभेत सर्वानुमते मंजूर केला; पण मुख्यमंत्र्यांनी खास दर्जा मिळणे शक्य नाही, असे विधान करून सरकारने गोमंतकीयांचा विश्वासघात केला, असे या संघटनेने म्हटले आहे. प्रजल साखरदांडे, गुरुदास कामत, अ‍ॅड. जतीन नाईक आदींनी सांगितले की गोव्याला खास दर्जा मिळवून देण्याची ग्वाही यापूर्वी आम्हाला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनीही खास दर्जाची मागणी हा निवडणुकीचा मुद्दा बनविला होता. मात्र, आता मुख्यमंत्री पार्सेकर खास दर्जा मिळणे शक्य नाही, असे म्हणतात व सावईकर मात्र त्याविषयी काहीच प्रतिक्रिया देत नाही. म्हणजे निवडणुकीवेळी या राजकीय नेत्यांनी लोकांना फक्त वापरले, आम्ही याचा निषेध करतो. गोव्याला खास दर्जा मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू. मुख्यमंत्री पार्सेकर यांना कायद्याचे ज्ञान नाही. घटनेच्या ३७० कलमाखाली गोव्याला खास दर्जा निश्चितच मिळू शकतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत; पण तत्पूर्वी त्यांनी केलेले विधान हा विश्वासघात ठरतो हे त्यांना कळायला हवे. मुख्यमंत्र्यांनी खास दर्जाविषयी केलेले विधान ही सरकारची अधिकृत भूमिका आहे काय तेही स्पष्ट व्हावे, असे कामत म्हणाले. या वेळी मंत्री साल्ढाणा म्हणाल्या की, आपण मंत्री या नात्याने नव्हे तर गोव्याला खास दर्जा मिळायला हवा, अशी मागणी करणाऱ्यांपैकी एक कार्यकर्त्या या नात्याने पत्रकार परिषदेस आले आहे. खास दर्जा मिळावा ही माझे पती स्वर्गीय माथानी यांचीही मागणी होती. गोव्याला तातडीने खास दर्जा मिळायलाच हवा, अशी आमची मागणी आहे. आम्ही ही मागणी पूर्ण होईपर्यंत संघर्ष करत राहू. (खास प्रतिनिधी)